
सरुड : कठोर परिश्रम, जिद्द व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेतून आपण आपले ध्येय कसे साध्य करू शकतो, हे सरुड (ता. शाहूवाडी) येथील अश्विनी बाबासाहेब कदम या सर्वसामान्य शेतकरी कुटुबांतील मुलीने दाखवून दिले आहे. तिने आठ महिन्यांत सलग तिसऱ्यांदा यश संपादन करत यशाची हॅट्ट्रिक साधली आहे.