दुर्गराज रायगडावर साजरा होणार 'शिवराज्याभिषेक सोहळा'

छत्रपती शिवराय व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे किल्ले रायगडावर हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो.
Raigad
RaigadSakal
Summary

छत्रपती शिवराय व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे किल्ले रायगडावर हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो.

कोल्हापूर : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही दुर्गराज रायगडावर ५ व ६ जून २०२२ रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होत आहे. यंदा 'धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची', 'जागर शिवशाहीरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा' व 'सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा' हे कार्यक्रम शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आकर्षण बिंदू असणार आहेत. देशभरातील लाखो शिवभक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

युगपुरुष छत्रपती शिवरायांनी सुमारे साडे तीनशे वर्षांपूर्वी लोकशाहीच्या तत्त्वावर स्वराज्याची उभारणी केली. अठरा अनुतेदार, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्यात ऐक्य घडवले. शत्रूवर जरब बसवत रयतेला स्वाभिमानाने जगण्याचा मंत्र दिला. छत्रपती शिवरायांचा ६ जून १६७४ सा राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याला छत्रपती मिळाने महाराष्ट्रासह देशभरात ही घटना इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद घेणारी ठरली. हा दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन तो 'राष्ट्रीय सण' म्हणून साजरा होण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती कार्यरत आहे. राज्याभिषेकाच्या स्मृती निरंतन राहाव्यात, यासाठी समितीतर्फे दरवर्षी दुर्गराज रायगडावर राज्याभिषेकाचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. यंदाही हा सोहळा ५ व ६ जूनला विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे.

छत्रपती शिवराय व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे किल्ले रायगडावर हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. देशभरातून इतिहास संशोधक, अभ्यासक, शिवभक्त, इतिहासप्रेमी या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. यंदा गडावर पाच जूनला सायंकाळी पाच वाजता 'धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची' हा शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम होणार.

गलका यांच्या विविध प्रकारांचे सादरीकरण होणार आहे व सायंकाळी सात वाजता राज दरबार येथे 'जागर शिवशाहीरांचा..स्वराज्याच्या इतिहासाचा' हा शाहीरी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील शाहीर सहभाग घेणार आहेत.

त्याचबरोबर ६ जूनला मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक झाल्यानंतर सोहळा पालखीना, स्वराज्याच्या ऐक्याचा' या पालखी मिरवणुकीत महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, अठरा अनुतेदारांसह सर्व धर्मातील लोक सहभागी होणार आहेत. आपापल्या पारंपरिक लोककलांचा मिरवणुकीत जागर घालणार आहेत. राजसदर, नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर असा पालखी सोहळ्याचा मार्ग असेल. या मार्गावरून पालखीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. सर्व शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्याभिषेकाची सोहळ्याची रुपरेषा अशी

दि. ५ जून २०२२

दु. ४:०० - युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत व शिवभक्तांच्या समवेत पायी गड चालण्यास प्रारंभ स्थळ: चित्त दरवाजा

सायं. ५:०० गडपूजन (२१ गावांतील सरपंच व पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या उपस्थितीत). स्थळ : नगारखाना. सायं. ५:०० – 'धार तलवारीची.. युद्धकला महाराष्ट्राची'. स्थळ- होळीचा माळ. सायं. ६:०० गतवैभव रायगडाचे, कार्य रायगड विकास प्राधिकरणाचे' या विषयावर विस्तृत सादरीकरण. स्थळ : हत्तीखाना

सायं. ७:०० - जागर शिवशाहीरांचा.. स्वराज्याच्या इतिहासाचा'. स्थळ : राज दरबार

रात्री ९:०० - गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ. स्थळ : शिरकाई मंदिर, रात्री ९:३० - जगदीश्वराचे वारकरी संप्रदायाकडून कीर्तन, जागर व काकड आरती. स्थळ- जगदीश्वर मंदिर,

रात्री ९:०० - अन्नछत्र. स्थळ : जिल्हापरिषद धर्मशाळा आणि पायथा.

दि. ६ जून २०२२

स. ६:०० ध्वजपूजन, ध्वजारोहन व जयघोष रणवाद्यांचा. स्थळ नगारखाना.

स. ६:५० - शाहिरी कार्यक्रम स्थळ : राज दरबार

स. ९:३० - छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन. स्थळ राजसदर.

स. ९:५० युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत व मिरवणुकीने राजसदरेवर आगमन,

स. १०:१० युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक.

स. १०:२० - मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक.

स. १०:२५- प्रास्ताविक : अध्यक्ष, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती. स. १०:३० - युवराज संभाजी छत्रपत्ती महाराज यांचे शिवभक्तांना मार्गदर्शन,

स. ११:०० - 'सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा' शिवराज्याभिषेक मुख्य पालखी सोहळ्यास प्रारंभ.

दु. १२:०० - जगदीश्वराचे दर्शन घेऊन पालखी सोहळ्याचा समारोप.

दु. १२:१० - युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस अभिवादन.

हि माहीती पुणे येथिल पत्रकार परिषदेत देण्यात आली यावेळी शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य धनंजय जाधव ,विश्वास काशिद, जयजित मोरे , स्वपनील कारखानीस उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com