
-गणेश शिंदे
जयसिंगपूर : नवसाक्षर शेतमजुरीला आणि शिक्षक त्यांच्या शोधासाठी शिवारात, अशी काहीशी अवस्था उल्लास नवभारत साक्षरता परीक्षेवेळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिसून आली. रविवारी सकाळी दहा वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षार्थी दैनंदिन कामाप्रमाणे मजुरीसाठी शेतात गेले. ग्रामीण भागातील अशा नवसाक्षरांना शोधून परीक्षा केंद्रावर आणताना शिक्षकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.