
शिरोळ मतदारसंघातील लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना शेती प्रश्नावर अनेक वर्षांपासून काम करते. पूर्वी मीच संघटनेचा घटक होतो; पण काही कारणांनी दुरावलो. आता पुन्हा संघटनेत आलो आहे. त्यामुळे मला संघटनेकडून बळ मिळेल. मला तालुक्याचा मालक नव्हे, तर सेवक म्हणून काम करायचे आहे. त्यामुळे या निवडणुकीत धनशक्तीचा पराभव निश्चित आहे, असा विश्वास ‘स्वाभिमानी’चे उमेदवार माजी आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केला.