शिरोळ : मजरेवाडीत दोन गटांत हाणामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मजरेवाडीत दोन गटांत हाणामारी

शिरोळ : मजरेवाडीत दोन गटांत हाणामारी

कुरुंदवाड: मजरेवाडी शिरोळ येथे पालखी मिरवणुकीसमोर फटाके उडवण्याच्या कारणावरून दोन गटांत राडा झाला. एकमेकांच्या अंगावर धावून शिवीगाळ झाली. त्यानंतर हाणामारी व दगडफेकीस सुरुवात झाल्याने गावात प्रचंड तणाव निर्माण झाला. दिवसभर वातावरण तणावपूर्णच होते. या प्रकरणी पोलिसांनीच फिर्याद दाखल केली असून २३ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही गटांतील काही कार्यकर्त्यांनी नंग्या तलवारी आणून दहशत माजवल्य‍ाची चर्चा आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीपासून दोन गटांत वाद धुमसत आहे. त्याचेच पर्यवसान आज हाणामारीत झाल्याची चर्चा आहे. होळकर चौकात साहेब ग्रुप व सरकार प्रेमी ग्रुपमधे वाद झाला. पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दिवसभर गावातील प्रमुख मंडळी पोलिस ठाण्यात गर्दी करून थांबून होते. दोन्ही गटांकडून मिटवामिटवीसाठी प्रयत्न सुरू होते; मात्र पोलिसांसमोरच हाणामारी झाल्याने अखेर रात्री उशिरा पोलिस नाईक राजेंद्र पवार यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा मजरेवाडी येथील किशोर बाळासाहेब जुगळे, संतोष सुधाकर चव्हाण, राजेंद्र मारुती गायकवाड, कुमार अण्णासाहेब पाटील, चिदानंद आप्पासाहेब पाटील, प्रथमेश शिवाजी खराडे, अमोल बाळासाहेब जुगळे, अभिषेक सदाशिव बदामे, रणजित अरुण माळी, प्रशांत सदाशिव माळी, सुशांत सदाशिव माळी, किशोर सुधाकर चव्हाण, अजिंक्य दिनकर नरुटे, शेखर दत्तात्रय कागले, शेखर गणेश ढवळे, पवन अजय माळी, विनायक चंद्रकात कारंडे, अभिजित संजय इंगळे, विश्वजित संजय इंगळे, सूरज आनंदा कागले, नरसू विठ्ठल गायकवाड, अमित दिनकर नरुटे, ऋतिक राजेंद्र कागले (सर्व रा. मजरेवाडी) अशा २३ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

युवतीसह दोघे जखमी

हाणामारी, दगडफेकीवेळी राजेंद्र कागले यांच्या डोक्यास मार बसला. दगडफेक, दंगा सुरू झाल्याचे ऐकून आपल्या वडिलांना घेण्यासाठी आलेल्या एका युवतीच्या पायाला दगड लागला आहे. दोघांना सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केले.हाणामारी, दगडफेकीवेळी राजेंद्र कागले यांच्या डोक्यास मार बसला. दगडफेक, दंगा सुरू झाल्याचे ऐकून आपल्या वडिलांना घेण्यासाठी आलेल्या एका युवतीच्या पायाला दगड लागला आहे. दोघांना सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :KolhapurSakalpolice case