

शिरोळ पोलिसांनी ऊस दर आंदोलनाला हिंसक वळण आल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
esakal
Sugarcane Price Protest Turns Violent : आजपासून (ता. १) अधिकृतपणे सुरू होणाऱ्या ऊस हंगामाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यात संघटनांनी आंदोलनाची रणनीती आखली आहे. तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही आंदोलक आणि संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणांवर ‘वॉच’ ठेवला आहे. उसाची वाहने पोलिस संरक्षणात कारखान्यात पोहोचणार आहेत. संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, आंदोलकांवर कठोर कारवाईच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यांना दिल्या आहेत.