उर्दू भाषेच्या गोडव्यामुळे ही भाषा विशिष्ट भागापुरती मर्यादित न राहता ती सातासमुद्रापलीकडे गेली आहे.
कोल्हापूर : ‘शायरी की जान उर्दू जुबान...’ असे म्हटले जाते. कारण उर्दूमधील गोडवा अन् नजाकत काहीशी हटकेच आहे. त्यामुळे उर्दूचे नेहमीच सर्वांना आकर्षण राहिले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात भाषा न पाहता शिक्षण (Education) महत्त्वाचे असल्याने अनेक बिगर मुस्लिम समाजातील (Muslim Community) लोकांनीही उर्दू भाषेचे शिक्षण घेतले. स्वातंत्र्यानंतर मात्र फक्त मुस्लिम समाजातीलच विद्यार्थी उर्दू भाषेचे (Urdu language) शिक्षण घेताना दिसतात. सध्या जिल्ह्याभरात सुमारे ३० शाळा असून, यापैकी सर्वाधिक उर्दू भाषिक शाळा शिरोळ तालुक्यात (Shirol Taluka) आहेत