Shiroli Toll Naka Accident : शिरोली टोलनाक्याजवळ भीषण अपघात, पुलावरून मोटार कोसळून एक ठार; ३० फुटांवरून मोटार पडली अन्...

Pune Bengaluru Highway accident : शिरोली टोलनाक्याजवळ भीषण अपघात झाला असून पुलावरून सुमारे ३० फुटांवर मोटार कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघाताची सविस्तर माहिती वाचा.
Shiroli Toll Naka Pune Bengaluru Highway accident

Shiroli Toll Naka Pune Bengaluru Highway accident

esakal

Updated on

Kolhapur road accident : तावडे हॉटेल ते शिरोली टोलनाक्यादरम्यान जुन्या पुलाजवळील सुरक्षा कठडा तोडून आज एक मोटार ३० फूट खाली कोसळली. या भीषण अपघातात दुर्गाप्रसाद हुवाप्पा ईटी (वय २६, रा. कावळा नाका परिसर, मूळ रा. लोकापूर, कर्नाटक) याचा जागीच मृत्यू झाला. मोटारीतील रोहित माने, रोहित जोंधळे व अर्जुन चौगुले जखमी झाले. चौघे गांधीनगरातून कावळा नाक्याकडे येत असताना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अपघात झाला. जखमींना कदमवाडीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Karad Kolhapur Naka Flyover latest update
When will Karad Flyover fully open?
Why is MIDC expanding in Kolhapur?
Karad traffic jam on Pune Bangalore Highway today
Marathi News Esakal
www.esakal.com