esakal | महाडिक बाप नव्हे जिल्ह्याचा ताप; शिवसेना खासदारांचा घणाघाती टोला

बोलून बातमी शोधा

महाडिक बाप नव्हे जिल्ह्याचा ताप; शिवसेना खासदारांचा घणाघाती टोला
महाडिक बाप नव्हे जिल्ह्याचा ताप; शिवसेना खासदारांचा घणाघाती टोला
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सरवडे (कोलहापूर) : जिल्ह्याचा बाप स्वतःला ते समजतात, ते बाप नाहीत तर अखंड जिल्ह्याचा ते ताप आहेत, हा ताप राधानगरीकर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, गोकुळ लुटण्याचे काम ते करत आहेत, त्यांची टॅंकरगिरी थांबवा, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी महादेवराव महाडिक यांना लगावला. अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथे विरोधी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या ठरावधारकाच्या सभेत ते बोलत होते.

गृह राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, "माजी खासदार धनंजय महाडिक म्हणतात महाडिक यांचा गोकुळमध्ये एकही टॅंकर नाही, मात्र महादेवराव महाडिक सांगतात "गोकुळ'ला माझे 40 टॅंकर आहेत. तुमच्यात ताळमेळ नाही. दर महिन्याला टॅंकरचे 80 लाख रुपये मिळतात. म्हणून त्यांचे तारखेकडे लक्ष असते. मल्टिस्टेट थांबल्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे अस्तित्व टिकून आहे.''

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, "" गेल्यावेळी त्यांना पाठिंबा देऊन आम्ही चूक केली. नोकरभरती आणि पशुखाद्यासाठी घेतलेल्या मोलॅशिसमध्ये भ्रष्टाचार केला.''

अभिजित तायशेट्ये यांनी स्वागत केले. अरुण डोंगळे, प्रकाश आबिटकर, ए. वाय. पाटील, विजयसिंह मोरे, किसन चौगले, के. पी. पाटील, सुजित मिणचेकर, धैर्यशील पाटील, वसंतराव पाटील, नंदकिशोर सूर्यवंशी, सदाशिव चरापले, नेताजी पाटील, रमेश वारके, फिरोजखान पाटील उपस्थित होते. अशोक फराकटे यांनी आभार मानले.

Edited By- Archana Banage