राजू शेट्टींविरोधातील वक्तव्य भोवलं! उद्धव ठाकरेंनी 'या' पदावरून मुरलीधर जाधवांची तडकाफडकी केली उचलबांगडी

यापूर्वी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना या पदावरून हटवले होते.
Uddhav Thackeray Raju Shetti Murlidhar Jadhav
Uddhav Thackeray Raju Shetti Murlidhar Jadhavesakal
Summary

हकालपट्टीच्या कारवाईमुळे जाधव यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना जोरदार धक्का बसला आहे. विशेष म्हणजे जाधव शिवसेनेकडून हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते.

हातकणंगले : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या भेटीनंतर श्री. शेट्टी यांच्याविषयी वादग्रस्त केलेले वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे हातकणंगले जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव (Murlidhar Jadhav) यांना चांगलेच भोवले. त्यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेत ठाकरे यांनी जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरून तडकाफडकी उचलबांगडी केली.

Uddhav Thackeray Raju Shetti Murlidhar Jadhav
Ajit Pawar : सांगली जिल्ह्यात जयंत पाटलांचा 'करेक्ट कार्यक्रम'; कट्टर समर्थकाचा अजितदादा गटात जाहीर प्रवेश

या निर्णयाने शिवसेना ठाकरे गटाच्या हातकणंगले लोकसभा मतदार संघात एकच खळबळ उडाली. यापूर्वी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना या पदावरून हटवले होते. पक्ष अडचणीत असल्याचा गैरफायदा घेऊन कोणी काहीही करत असेल, तर ते खपवून घेणार नाही, असा संदेश यानिमित्ताने ठाकरे यांनी दिला आहे.

जाधव हे गेली १९ वर्षे जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत होते. अनेक आक्रमक आंदोलनांत त्यांचा हिरीरीने सहभाग होता. त्यांच्या शिवसेनाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावरच दिग्गजांचा विरोध डावलून ठाकरे यांनी त्यांची ‘गोकुळ’च्या शासन नियुक्त संचालकपदी नियुक्ती केली होती.

Uddhav Thackeray Raju Shetti Murlidhar Jadhav
Loksabha Election : 'लोक शरद पवारांच्या पाठीशी, माढ्यात निश्चित परिवर्तन घडेल'; NCP नेत्याचं थेट महायुतीलाच चॅलेंज

दरम्यान, जाधव यांच्या हकालपट्टीनंतर झालेल्या रिक्त पदावर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील हातकणंगले व शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुखपदी संजय धुळासाहेब चौगुले व शिरोळचे तालुकाप्रमुख वैभव उगळे यांची निवड केली आहे. निवडीची घोषणा शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. चौगुले यांच्या निवडीनंतर माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हातकणंगले येथील कार्यालयासमोर शिवसैनिकांनी जल्लोष केला. चौगुले यांचा सत्कार डॉ. मिणचेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

हकालपट्टीच्या कारवाईमुळे जाधव यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना जोरदार धक्का बसला आहे. विशेष म्हणजे जाधव शिवसेनेकडून हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. दोनच दिवसांपूर्वी माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर जाधव यांनी शेट्टी यांच्यावर जहरी टीका केली होती. ती टीका त्यांना भोवली असल्याची चर्चा आहे.

Uddhav Thackeray Raju Shetti Murlidhar Jadhav
Udayanraje Bhosale : जितेंद्र आव्हाडांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे; प्रभू श्रीरामांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर उदयनराजे आक्रमक

दरम्यान, हकालपट्टीनंतर जाधव यांच्या पुढील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. नूतन जिल्हाप्रमुख उगळे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विलास उगळे यांचे पुतणे असून, जिल्ह्यात सर्वप्रथम शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवण्यात उगळे कुटुंबीयांचा मोलाचा वाटा आहे. वैभव उगळे यांच्या नियुक्तीने पुन्हा एकदा शिवसेनेची सूत्रे उगळे कुटुंबीयांकडे आली.

उगळे यांच्या नियुक्तीनंतर समर्थकांनी जल्लोष साजरा केला.जिल्हाप्रमुख उगळे कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष असून, त्यांच्याकडे जिल्हाप्रमुख म्हणून शिरोळ व इचलकरंजी या दोन मतदारसंघांची जबाबदारी आहे. सत्कार समारंभास जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण यादव, पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील, माजी सदस्य महेश चव्हाण, युवती सेनेच्या सलोनी शिंत्रे, महिला आघाडीच्या सुवर्णा धनवडे उपस्थित होते.

Uddhav Thackeray Raju Shetti Murlidhar Jadhav
Textile Industry : इचलकरंजीतील 'पॉवरलूम मेगा क्लस्टर'ला भांडवली अनुदान; वस्त्रनगरीत तब्बल 400 उद्योगांना होणार फायदा

भविष्यकाळात शिवसेनेमध्ये (ठाकरे गट) कसलीही गटबाजी असणार नाही. फक्त ठाकरे हा एकच गट असेल. त्याचबरोबर सर्व नव्या-जुन्या पदाधिकाऱ्यांना व शिवसैनिकांना सोबत घेऊनच पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले जातील.

-संजय चौगुले, नूतन जिल्हाप्रमुख, शिवसेना

हुपरी परिसरातील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

हुपरी : शिवसेनेचे(ठाकरे) जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची पदावरून हटविण्याच्या निर्णयाचे परिसरात संमिश्र पडसाद उमटत आहेत. शहरप्रमुख राजेंद्र पाटील यांच्यासह युवासेनेचे अध्यक्ष भरत देसाई, विभागप्रमुख सरदार सूर्यवंशी (पट्टणकोडोली), वासु घुणके (यळगूड) आदींनी पदाचे तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. रेंदाळ, रांगोळी, यळगूड,पट्टणकोडोली, तळंदगे, इंगळी आदी गावांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जाधव यांच्यावरील कारवाईच्या विरोधात पदांचे राजीनामे देण्याचा पवित्रा घेतला आहे, तर शिवसैनिकांच्या असंतुष्ट गटाकडून कारवाईचे स्वागत केले जात आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी काल बुधवारी (ता. ३)आपली नाराजी उघडपणे मांडली. त्याचे पडसाद वरिष्ठ पातळीवर उमटत त्यांना पक्षीय कारवाईला सामोरे जावे लागले. या अनपेक्षित धक्क्याने परिसरातील शिवसैनिकांत खळबळ उडाली आहे.

Uddhav Thackeray Raju Shetti Murlidhar Jadhav
मृत्यू समोर दिसत होता, पण अर्धांगिनीने किडनी देऊन वाचविले 'सौभाग्य'; शेख दांपत्‍यावर यशस्वी शस्त्रक्रिया

आदित्य ठाकरे यांच्या सभेविषयी उत्सुकता

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्या अंतर्गत मंगळवारी (ता. ९) येथील हुतात्मा स्मारक मैदानावर सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्या सभेच्या यशस्वीतेसाठी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्यासह पदाधिकारी झटत होते. विभागवार तसेच विविध गावांमध्ये बैठका सुरू होत्या. या दरम्यानच त्यांच्या हकालपट्टीचा आदेश धडकल्याने आदित्य ठाकरे यांच्या सभेविषयी उत्सुकता वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com