

Haryana Assembly Speaker Harvinder Kalyan during the tribute ceremony at Panipat.
sakal
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक करण्यासाठी हरियाना सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही हरियानाच्या विधानसभेचे सभापती हरविंदर कल्याण यांनी दिली. आखिल भारतीय मराठा जागृती मंचतर्फे पानिपत येथे १७६१ च्या युद्धातील धारातीर्थी वीरांना आदरांजली वाहण्यासाठी झालेल्या शौर्य दिवस कार्यक्रमात ते बोलत होते.