
कोल्हापूर : कमीत कमीत दोन कोटी रुपये इतकी रक्कम ठेव म्हणून निधी स्वरूपात जमा केल्यानंतरच शिवाजी विद्यापीठात ‘संगीतसूर्य केशवराव भोसले’ अध्यासन कार्यान्वित करण्याची कार्यवाही होणार आहे. त्याबाबतचे पत्र विद्यापीठ प्रशासनाने या अध्यासन उभारणीची मागणी करणाऱ्या डॉ. सतीश पावडे यांना पाठविले.