Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी
Sewage Issue : शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये गंभीर पर्यावरणीय संकट उभे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. दररोज तयार होणारे सुमारे चार लाख लिटर सांडपाणी योग्य प्रक्रिया न करता थेट जमिनीत मुरविले जात असल्याचा आरोप होत आहे.
कोल्हापूर : सांडपाणी, घातक कचऱ्याची यांत्रिक पद्धतीने प्रक्रिया करून विल्हेवाट लावली नाही, तर निर्सगसंपन्नता, जैवविविधतेने नटलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या परिसरातील (कॅम्पस) भूजल धोक्यात येण्याची शक्यता आहे.