esakal | शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा तिसऱ्यांदा लांबणीवर; लवकरच नवे वेळापत्रक

बोलून बातमी शोधा

shivaji university exams postponed third time in kolhapur

या परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा तिसऱ्यांदा लांबणीवर; लवकरच नवे वेळापत्रक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ६ एप्रिल ते १२ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. रात्री उशिरा झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. राज्यात ‘ब्रेक द चेन’साठी निर्बंध लागू झाले. महाविद्यालयात ऑफलाइन परीक्षा घेणे शक्‍य नाही. पर्यायाने परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या. कुलगुरू परीक्षांबाबत जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणार आहेत. त्यानंतर या परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा - गोकुळ रणांगण; उमेदवारीत प्रमुख दावेदारांचा पत्ता कट, दोन्ही पॅनेलला धक्का