esakal | शिवाजी विद्यापीठाच्या फॅकल्टी चेंज विद्यार्थ्यांना दिलासा....
sakal

बोलून बातमी शोधा

Shivaji University Faculty Change Comforts Students kolhapur

शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील सुमारे ४० विद्यार्थ्यांना अपात्र ठरविल्याने त्यांच्यात अस्वस्थता पसरली होती. प्रशासनाने त्याची दखल घेत त्रिसदस्यीय समिती नेमली होती.

शिवाजी विद्यापीठाच्या फॅकल्टी चेंज विद्यार्थ्यांना दिलासा....

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - फॅकल्टी चेंज करून एमएची नियमित सेमिस्टर एकची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. त्यांचा सेमिस्टर दोन परीक्षेला बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विद्यार्थ्यांना अपात्र ठरविल्याने त्यांचा निकाल राखून ठेवला होता. या विषयासंदर्भात ‘सकाळ’मध्ये‘फॅकल्टी चेंजमुळे जीव टांगणीला’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते.

दुसऱ्या सेमिस्टरचा मार्ग मोकळा; समितीने ठरविले पात्र

शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील सुमारे ४० विद्यार्थ्यांना अपात्र ठरविल्याने त्यांच्यात अस्वस्थता पसरली होती. प्रशासनाने त्याची दखल घेत त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीने बैठक घेऊन विद्यार्थ्यांना पात्र ठरवावे, अशी शिफारस विद्या परिषदेकडे केली. तसेच त्यांना सेमिस्टर दोन परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. असे असताना त्यांचे निकाल जाहीर झालेले नव्हते. ते आता जाहीर झाले आहेत. विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्याच्या तयारीला लागले आहेत. समितीने विद्या परिषदेकडे शिफारस केली असली तरी विद्या परिषदेत होणाऱ्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. येत्या महिन्याभरात विद्या परिषदेची बैठक होणार असून, त्यात काय निर्णय होणार याकडेही विद्यार्थ्यांचे 
लक्ष आहे.

loading image