विद्यार्थ्यांनी ‘आपलं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’, ‘आमचं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’, ‘नको नको नामविस्तार नको’, अशा दहा मिनिटे घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
कोल्हापूर : ‘आपलं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’ (Shivaji University Kolhapur) असा नारा देत कोल्हापुरातील शिवप्रेमी, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला तीव्र विरोध दर्शविला. विद्यापीठ प्रांगणात त्यांनी ‘शिवाजी विद्यापीठ आमचा अभिमान,’ ‘जय भवानी जय शिवाजी’, असा जोरदार जयघोष केला. विद्यापीठाचा नामविस्तार कोणत्याही परिस्थितीत करू देणार नसल्याचा ठाम निर्धार त्यांनी यावेळी शपथ घेवून केला.