Shivaji University : विद्यार्थ्यांनी ऐकली सात प्रकारची शिट्टी; श्रीकांत काजवे यांचे सादरीकरण; विद्यापीठात संगीत-नाट्यशास्त्र अधिविभागात कार्यक्रम
Whistling Art : शिवाजी विद्यापीठ येथील संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात ‘शब्द-सूर’ कार्यक्रमात अनोख्या शीळ वादनाची मैफल रंगली. श्रीकांत काजवे यांनी सात प्रकारच्या शिट्टी वादनाचे प्रात्यक्षिक सादर करत विद्यार्थी आणि रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाने घेतलेल्या ‘शब्द-सूर’ या कार्यक्रमात इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्चे विजेते श्रीकांत काजवे यांनी त्यांच्या अनोख्या शीळ वादनाने विद्यार्थी, श्रोत्यांना थक्क केले.