नामविस्ताराच्या विरोधातील निवेदन या शिष्टमंडळाने शासकीय विश्रामगृहात उपमुख्यमंत्री पवार यांना दिले. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) उपस्थित होते.
कोल्हापूर : नामविस्तार झाला, तर ‘शिवाजी’ या नावाचा उल्लेख होणार नाही. त्याने विद्यापीठाची मूळ ओळख संपणार आहे. त्यामुळे विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात येऊ नये. शिवाजी विद्यापीठ हेच नाव योग्य असल्याची भूमिका शिवप्रेमी आणि शिवाजी विद्यापीठ (Shivaji University Kolhapur) विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासमोर मांडली.