बहुजनांसाठी हसन मुश्रीफांचे कार्य कौतुकास्पद : खासदार संभाजीराजे

shivgarjana mahanatya was inaugurated by MP Sambhaji Raje Chhatrapati at kagal
shivgarjana mahanatya was inaugurated by MP Sambhaji Raje Chhatrapati at kagal
Updated on

कागल - ‘हसन मुश्रीफ यांच्यासारखा बहुजन समाजातील व्यक्ती छत्रपती शिवरायांचा कार्यक्रम घेतो. यातून शिवराय हे फक्त मराठ्यांचे नसून अठरापगड जातीचे व बारा बलुतेदारांचे होते. बहुजन समाजाचे होते हेच लक्षात येते. तोच विचार घेऊन मंत्री हसन मुश्रीफ जात आहेत,’ असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

कागलच्या शाहू स्टेडियमवर घुमली ‘शिव गर्जना’

हसन मुश्रीफ फाऊंडेशन, कागल नगर परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवगर्जना महानाट्य २२ व २३ फेब्रुवारीला येथील राजर्षी शाहू स्टेडियमवर होत आहे. या महानाट्याचे उद्‌घाटन खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय घाटगे, के.पी. पाटील, ए.वाय. पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. महानाट्य पाहण्यासाठी प्रचंड मोठ्या लोक उपस्थित होते.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘‘शिवाजी महाराजांनी जातीधर्माच्या पलीकडे जाऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्य हे आपले म्हणजे अठरापगड जातीचे व बारा बलुतेदारांचे आहे. शिवाजी महाराजांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवगर्जना महानाटय इथल्या जनतेला मोफत दाखवित आहे.’’
लेखक इंद्रजित सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. वैभव कमळकर, रणजित निकम, इंद्रजीत सावंत, स्वप्नील यादव, रूपाली कांबळे यांचा सत्कार झाला. स्वागत नितीन दिंडे व प्रास्ताविक प्रताप उर्फ भैया माने यांनी केले. यावेळी रमेश माळी, युवराज पाटील, नवीद मुश्रीफ, नगराध्यक्षा सौ. माणिक माळी, आर.के. पोवार, मदन कारंडे आदींसह कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

स्टेडियम खचाखच

शिव गर्जना हे महानाट्य पाहण्यासाठी अलोट गर्दीने लोक उपस्थित होते. शाहू स्टेडियम प्रेक्षकांच्या गर्दीने खचाखच भरले होते. शिव गर्जना महानाटयाने कागलकरांची मने पहिल्याच दिवशी जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com