
जवाब दो! खासदार धैर्यशील मानेंच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणाऱ्या खासदार धैर्यशील माने यांनी शिवसैनिक व मतदारांच्या भावनांचा अपमान केला असून त्यांच्या कोल्हापूर येथील कार्यालय आणि घरावर धडक मोर्चा काढणार असल्याचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, आज खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा धडकला आहे. खासदार माने सध्या दिल्ली येथे असून या मोर्चाला विरोध करु नका अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. (kolhpaur shivsena mp dhairyashil mane house protest from shivesena)
खासदार माने यांना प्रवक्ता पदासह सर्वकाही देऊनही त्यांनी कुटुंबाशी गद्दारी केली आहे. याचा जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरावर व कार्यालयावर मोर्चा काढणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिली होती. खासदार माने हे शिंदे गटात गेले असल्याने कोल्हापुरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसेनेकडून पद मिळूनही मानेंनी हा निर्णय का घेतला असा सवाल आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे खासदार माने जवाब दो, अशा घोषणाही यावेळी आंदोलकांकडून देण्यात आल्या आहेत.
Web Title: Shivsena Mp Dhairyashil Mane Shivsena Protest In Kolhapur House Police And Acitiviist Together
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..