esakal | मिरजेची सभापतीपदाची हॅटट्रिक: BJP च्या निरंजन आवटींनी मारली बाजी
sakal

बोलून बातमी शोधा

nirajan aavti

मिरजेची सभापतीपदाची हॅटट्रिक: BJP च्या आवटींनी मारली बाजी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली: महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी भाजपचे निरंजन आवटी आणि कॉंग्रेसचे फिरोज पठाण यांच्यात आज लढत झाली. अपेक्षेनुसार आवटीयांनी काँग्रेसचे पठाण यांचा ९-७ असा पराभव केला. या निवडीमुळे सलगतिसऱ्या वर्षी सभापतीपद मिरजेला मिळाले.

महापालिकेच्या तीन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक ४१ जागाजिंकून सत्ता मिळवली. परंतू सहा महिन्यापूर्वी झालेल्या महापौरपदाच्यानिवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीने भाजपचे सहा नगरसेवक फोडून सत्तांतर घडवून आणत भाजपला धक्का दिला. सध्या महापौरपद राष्ट्रवादीकडे तर विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसकडे आहे. महापौर निवडीनंतर स्थायी सभापती निवडीकडे लक्ष लागले होते.

स्थायीमध्ये १६ सदस्य असून त्यापैकी नऊ सदस्य भाजपचे आहेत. तर कॉंग्रेसचे चार, राष्ट्रवादीचे तीन सदस्य आहेत. संख्याबळानुसार भाजपचे वर्चस्व स्थायीमध्ये कायम आहे. त्यामुळे सभापतीपदी निरंजन आवटी यांची निवड निश्‍चितच मानली जात होती. स्थायी समिती सभापती पद निवडणुकीसाठी आज महापालिकेत विशेष सभा झाली.यामध्ये भाजपच्या ९ सदस्यांनी श्री. आवटी यांना मतदान केले. तर काँग्रेसआघाडीच्या ७ सदस्यांनी पठाण यांना मतदान केले. ९-७ असा अपेक्षेप्रमाणे आवटी यांनी विजय मिळवला.

हेही वाचा: कडक बंदोबस्तात राज्यपाल कोश्‍यारी यांचा सांगली दौरा सुरु

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांच्याअध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली. यावेळी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस उपस्थित होते. आवटी यांच्या निवडीने मिरजेने सभापती निवडीत हॅटट्रिक साधली आहे.तर आवटी यांच्या कुटुंबातही तिसऱ्यांदा हे पद आले आहे. यापूर्वी सुरेश आवटी यांना २००९ मध्ये महाआघाडीच्या काळात सभापतीपद मिळाले होते.त्यानंतर त्यांचा मुलगा संदीप आणि आता निरंजन यांनाही सभापतीपद मिळाले.त्यामुळे कुटुंबातही सभापतीपद तिसऱ्यांदा मिळाले.

loading image
go to top