esakal | धक्कादायक! मोबाईल वापरावर निर्बंध घातल्याने 17 वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

 गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! मोबाईल वापरावर निर्बंध लावल्याने 17 वर्षीय मुलीची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी: येथील बाजारपेठेतील साक्षी दिपक सोनुले (वय 17) या युवतीने राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केली. हा प्रकार आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला. मोबाईल वापरावर निर्बंध घातल्यामुळे तिने हे पाऊल उचलले असे सांगितले जात आहे. दरम्यान आठवडाभरातील आत्महत्येची ही तिसरी घटना आहे.

हेही वाचा: 'एकरुख'साठी डिसेंबरअखेरपर्यंत मिळणार 50 कोटी - सिद्धाराम म्हेत्रे

येथील शहरातील पश्चिम बाजारपेठेत दिपक आनंदराव सोनुले हे कुटुंबासमवेत राहतात. त्यांची मुलगी साक्षी ही अलीकडे मोबाईलचा अवास्तव वापर करीत होती. त्यावरून त्यांच्यात किरकोळ वाद देखील झाले होते. त्यामुळे त्यांनी मोबाईलवर निर्बंध घातले होते. साक्षीची समजुत देखील काढण्यात आली होती; परंतु आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरात कुणीही नसल्याचे पाहुन साक्षीने घरातील लोखंडी बारला ओढणीचा गळफास घेऊन आत्महत्या केली.

कामानिमित्त बाहेर गेलेली घरातील मंडळी घरी आल्यानंतर घराचा दरवाजा बंद असल्याचे दिसुन आले. त्यामुळे त्यांनी दरवाजा उघडण्यासाठी साक्षीला हाक दिली; परंतु घरातून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्यांनी खिडकीतून डोकावुन पाहीले असता ती लोखंडी बारला लटकत असल्याची दिसून आली. या प्रकाराची खबर वडील दिपक यांनी पोलीसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, मारूती साखरे आदी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्राथमिक माहिती नातेवाईकांकडून घेतली. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस हवालदार माधवी अडुळकर करीत आहेत.

वैभववाडीत आत्महत्यांचे सत्र

वैभववाडी गेल्या आठ दिवसांत तीन आत्महत्या झाल्या आहेत. सडुरे, कुर्ली आणि आज वैभववाडीतील 17 वर्षीय तरूणीने आत्महत्या केली आहे.

loading image
go to top