'एकरुख'साठी डिसेंबरअखेरपर्यंत मिळणार 50 कोटी - सिद्धाराम म्हेत्रे

अक्कलकोट तालुक्‍याला वरदायिनी असणाऱ्या एकरुख उपसा सिंचन योजनेला डिसेंबरअखेर 50 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.
'एकरुख'साठी डिसेंबरअखेरपर्यंत मिळणार 50 कोटी - सिद्धाराम म्हेत्रे
sakal
Updated on

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्‍याला वरदायिनी असणाऱ्या एकरुख उपसा सिंचन योजनेला डिसेंबरअखेर 50 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. तसेच देगाव एक्‍सप्रेस कॅनोलसाठी 50 कोटीची मागणी व बबलादच्या बंधाऱ्याचे बॅरेजेसमध्ये रूपांतर करण्याच्या सर्व्हेसाठी 50 लाखाची तरतूद यासाठी मुंबई येथे मंत्रालयात जलसंपदा विभागाच्या अधिकारी व सचिवांसोबत बैठक झाल्याची माहिती माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली.

'एकरुख'साठी डिसेंबरअखेरपर्यंत मिळणार 50 कोटी - सिद्धाराम म्हेत्रे
वर्षानंतरही शेतकऱ्यांना मिळेना भरपाई! 4246 शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

पंधरा दिवसापूर्वी माजी आमदार म्हेत्रे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना भेटून निवेदन दिले होते. त्यावेळी मंत्री पाटील यांनी बैठक लावून हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या महत्त्वाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे होते. या बैठकीला जलसंपदा, कृष्णा खोरे महामंडळ, भीमा खोरे जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. एकरुख उपसा सिंचन योजनेच्या वितरण व्यवस्थेच्या कामासाठी या अर्थसंकल्पात 50 कोटींची तरतूद होणार आहे.

एकरुख उपसा सिंचन योजनेमुळे अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील जवळपास 17 हजार हेक्‍टर जमीन ओलिताखाली येणार आहे. तसेच देगाव एक्‍सप्रेस कॅनॉलसाठी 26 ते 64 किलोमीटरमधील कामाचे सर्वेक्षण करण्यात यावे व भूसंपादन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अक्कलकोट तालुक्‍यातील बबलाद येथील बबलाद केटीवेअरचे बॅरेजेसमध्ये रूपांतर करण्यात येणार असून त्याच्या सर्वेसाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Milk Rate
Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Laxman Hake Y Plus Security Under Fire as Mahesh Dongre Patil Gives Government 15 Days Before High Court Action
Marathi News Esakal
www.esakal.com