

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात एका शिक्षकाने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.
esakal
Kolhapur Teacher News : सार्वजनिक बांधकाम विभागाने बेकायदेशीरपणे बांधकाम पाडल्याचा आरोप करत बेनिक्रे (ता. कागल) येथील शिक्षक शंकरराव रामशे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न रोखला. नंतर पोलिसांनी समज देऊन त्यांना सोडून दिले.