esakal | धक्कादायक ः आयटीआय 48 हजार विद्यार्थ्यांनी विकल्पच भरले नाहीत
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक ः आयटीआय 48 हजार विद्यार्थ्यांनी विकल्पच भरले नाहीत

औद्योगिक प्रशिक्षण क्रेंद्र (आयटीआय) प्रवेशासाठी नेहमी मोठा प्रतिसाद असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे राज्यातील प्रवेशक्षमतेच्या केवळ दीडपट प्रवेशअर्ज आले आहेत.

धक्कादायक ः आयटीआय 48 हजार विद्यार्थ्यांनी विकल्पच भरले नाहीत

sakal_logo
By
दीपक कुपन्नावर


गडहिंग्लज, कोल्हापूर ः औद्योगिक प्रशिक्षण क्रेंद्र (आयटीआय) प्रवेशासाठी नेहमी मोठा प्रतिसाद असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे राज्यातील प्रवेशक्षमतेच्या केवळ दीडपट प्रवेशअर्ज आले आहेत. यात दोन लाख 55 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. पंरतू, यातील तब्बल 19 टक्के म्हणजेच 48 हजार 518 विद्यार्थ्यांनी विकल्प भरलेले नसल्याने अर्ज अपुर्ण आहेत. केवळ अर्जाद्‌वारे नव्हे तर विविध संस्था आणि अभ्यासक्रमासाठी (कोर्स) विकल्प भरल्यानंतरच प्रवेश मिळू शकतो. त्यामुळेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी तिसऱ्यांदा मुदत वाढवत 31 ऑगस्ट अखेर केली आहे. 
कोरोनामुळे विद्यार्थ्यांची कागदपत्रासाठी अडचणी लक्षात घेऊन दुसऱ्यांदा वाढवलेली ही मुदत उद्या (ता.21) संपणार होती. अजुनही विद्यार्थ्याच्या अडचणी कायम असल्याने तिसऱ्यांदा मुदत वाढवून 31 ऑगष्ट अखेर करण्यात आली आहे. तीन सप्टेंबरला कच्ची तर 5 सप्टेंबरला पक्की गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. 
कोरोना संर्सगाचा धोका लक्षात घेऊन यावर्षी विद्यार्थ्यांना इंटरनेट असणाऱ्या मोबाईल, कॉम्युटरने प्रवेशअर्ज भरण्याची सुविधा केली आहे. यंदा अनेक विद्यार्थ्यानीं कोणत्याही संस्थेत न जाता नेट कॅफेतुन अर्ज भरले आहेत. अपुऱ्या माहितीमुळे संस्था व कोर्ससाठी विकल्प भरलेले नाहीत. केवळ पहिल्यांदा भरलेल्या अर्जावरच प्रवेश मिळणार अशीच त्यांची समजुत झाल्याने त्यांनी विकल्पच सादर केले नाहीत. त्यामुळेच अधिक संख्येने अर्ज अपुर्ण राहीले. यासाठी प्रत्येक तालुक्‍यातील शासकिय आयटीआय मार्फत प्रवेश अर्जाचीं सविस्तर माहितीद्‌वारे विकल्प भरण्यासाठी संबधित विद्यार्थ्यांकडे प्रवेश प्रोत्साहन आभियानअंतर्गत पाठपुरावा सुरु आहे. 

अर्जांची संख्या दृष्टिक्षेपात 
नोंदणीकृत 255803 
पुर्ण अर्ज 230760 
शुल्क भरलेले 221585 
विकल्प भरलेले 207285 
हरकती 4605

loading image
go to top