तीन दिवस जोतिबा डोंगर होणार लॉक ; श्रावण षष्ठी यात्रा रद्द

जोतिबा डोंगरावर साध्या पद्धतीने श्रावण षष्ठी यात्रा ; यात्रेसाठी भाविकांनी येऊ नये
तीन दिवस जोतिबा डोंगर होणार लॉक ; श्रावण षष्ठी यात्रा रद्द

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर ता. पन्हाळा येथील आदिमाया चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा शुक्रवारी ( ता. १३ ) एकदम साध्या पद्धतीने व भाविकांवीना होत असून या यात्रेसाठी भाविकांनी डोंगरावर येऊ नये असे अवाहन पन्हाळा शाहुवाडी विभागाचे प्रांताधिकारी अमित माळी यांनी केले. या बाबत देवस्थान समितीच्या कार्यालयात श्रावण षष्ठी यात्रे संदर्भात बैठक झाली. यावेळी तहसीलदार रमेश शेंडगे सरपंच राधा बुणे, देवस्थान समितीचे अधिक्षक महादेव दिंडे, कोडोलीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद दहा गावकर पुजारी ग्रामस्थ उपस्थीत होते.

Summary

जोतिबा डोंगरावर साध्या पद्धतीने श्रावण षष्ठी यात्रा.....

शुक्रवार ते रविवार तीन दिवस डोंगर पूर्णपणे लॉक डाऊन करण्यात येणार आहे. भाविक ग्रामस्थ पुजारी यांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे. नियम मोडल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यंदा ही कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे प्रशासनाने श्रावण षष्ठी यात्रा रद्द केली असून केवळ मंदिरामध्ये धार्मिक विधी व इतर पारंपारीक विधी होतील.

तीन दिवस जोतिबा डोंगर होणार लॉक ; श्रावण षष्ठी यात्रा रद्द
कोल्हापूरचे नाव 'कलापूर' करा ; सचिन पिळगावकरांची आग्रही मागणी

जयसिंगपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक वैजेने यांच्या मार्गदर्शनाखाली कोडोली पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद यांनी डोंगरावर आज पहाणी करून बंदोबस्ताचे सर्व नियोजन केले. सर्व डोंगर तीन दिवस पूर्णपणे बंद करण्यात येणार असून परिसरातील डोंगरावर येणाऱ्या सर्व वाटा ही बंद करण्यात येणार आहेत. चैत्र यात्रेप्रमाणे या षष्ठी यात्रेतही भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे .शनिवारी (ता. १४) पहाटे मंदिर परिसरात धुपारती निघेल व षष्ठी यात्रेची सांगता होईल . रविवार पर्यंत डोंगरावर बंदोबस्त असेल. जोतिबाच्या सर्व भाविकांनी षष्ठीचा उपवास आपआपल्या घरी शुक्रवारी ( ता. १३ ) धरावा व शनिवारी सोडावा असे आवाहन पूजारी ग्रामस्थांनी केले आहे .

दरम्यान , यंदा डोंगरावर कोरोनामुळे चैत्र यात्रा झाली नाही . त्यात आता श्रावण षष्ठी यात्रा ही रद्द झाल्याने मोठा आर्थिक फटका ग्रामस्थ पूजारी दुकानदार व्यापारी तसेच किरकोळ व्यावसाईक यांना ही बसला आहे . शासनाने तीर्थ क्षेत्राचे गाव म्हणून सवलती द्यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com