esakal | दख्खनचा राजा श्री जोतिबाचे मानाचे उंट, घोडे 'या' गावात ठेवले जातात चार महिने संरक्षणासाठी
sakal

बोलून बातमी शोधा

Shri Jyotiba temple kolhapur festival story by niwas mote

यांच्या देखभालीसाठी देवस्थान समितीने कायमस्वरूपी दोन कर्मचारी नेमले आहेत

दख्खनचा राजा श्री जोतिबाचे मानाचे उंट, घोडे 'या' गावात ठेवले जातात चार महिने संरक्षणासाठी

sakal_logo
By
निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असणाऱ्या दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचे उंट, घोडा या मानाच्या प्राण्यांना पावसाळ्यात चार महिने  थंडी, वारे, धुके यापासून संरक्षण होण्यासाठी त्यांना जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या पोहाळे तर्फ आळते ता. (पन्हाळा )या गावात ठेवले जाते. या प्राण्यासाठी येथे पूर्वीपासूनच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने थटी नावाची इमारत बांधली आहे.

याठिकाणी या प्राण्यांना  ७ जूनचा सरता रविवार झाल्यानंतर त्यांना पोहाळे गावी आणण्यात येते. यांच्या देखभालीसाठी देवस्थान समितीने कायमस्वरूपी दोन कर्मचारी नेमले आहेत. या प्राण्यांना जोतिबा पोहाळे परिसरात गवताची पाच कुरणे असून याठिकाणी येथील चारा घातला जातो. पूर्वापार चालत आलेल्या पध्दती नूसार याला पोहाळे गावी येण्याची प्रथा आहे.

हेही वाचा- तोपर्यंत मराठा आंदोलन सुरुच राहील -

 ज्योतिबा डोंगरावर चार महिने सतत पावसाची रिपरिप, थंडगार हवा, दाट धुके अल हवामान असते . या प्राण्यांना हे सहन होत नाही. म्हणून त्यांचे पावसाळ्यामध्ये संरक्षण होण्यासाठी या गावी आणण्याची उपायोजना पूर्वीपासूनच पूर्वजांनी केली आहे . साठ वर्षापूर्वीपूर्वी या देवस्थान समितीकडे एक हत्ती ही होता. त्याची देखभाल पूर्वी याच गावी व्हायची . कालांतराने या हत्तीचा खर्च देवस्थानला  सोसवेना. पुढे तो वयोवृद्ध झाल्यावर मरण पावला . त्यानंतर उंट घोडा हे दोन प्राणी मात्र जोतिबाच्या धुपारती सोहळा, पालखी सोहळ्यासाठी नियमित वापरले जावू लागले .


 सोनू नावाचा मानाचा घोडा हा निगवे दुमाला ता. करवीर येथील हिम्मत बहादूर चव्हाण सरकार यांनी श्री चरणी अर्पण केला आहे . उंट मात्र देवस्थान समितीने राजस्थान भागातून आणला आहे दरम्यान ,पावसाळा संपत आल्यानंतर नवरात्र उत्सव काळात मात्र या प्राण्यांना ज्योतिबा डोंगरावर आणले जाते. तेथेही या प्राण्याची चांगल्या चांगल्या प्रकारे देखभाल केली जाते. पोहाळेतून आठवडाभरापूर्वी हे प्राणी डोंगरावर दाखल झाले आहेत . या मानाच्या उंट घोडे यांचे औक्षण करण्यात आले.

संपादन - अर्चना बनगे
 

loading image
go to top