esakal | श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचा नृसिंहवाडीत जन्मकाळ साजरा
sakal

बोलून बातमी शोधा

nrusinhwadi

श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचा नृसिंहवाडीत जन्मकाळ साजरा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नृसिंहवाडी : येथील दत्त मंदिरात  श्रीपाद  श्रीवल्लभ  महाराज  जन्मकाळ  सोहळा उत्साहात साजरा झाला. जन्मकाळानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. दत्त मंदिरात पहाटेच्या काकडआरती व पूजेनंतर सकाळी सूर्योदयावेळी सकाळी सहा वाजून २० मिनीटांनी जन्मकाळ सोहळा झाला.

येथील दिलीपशास्त्री उपाध्ये यांनी पुराण वाचन केले. जन्मकाळावेळी आकर्षक फुलांनी सजवलेल्या श्रींच्या चांदीच्या पाळण्यावर अबिर, गुलाल व फुलांची उधळण केली. गोविंद दत्तात्रय पुजारी यांनी विधिवत पूजन केले. येथील ब्रम्हवृंदांनी पारंपरिक पाळणा म्हटला व महिलांनी श्रींचा पाळणा जोजविला व मंगल आरतीने ओवाळले. यानंतर भक्तांना सुंठवडा व शिरा प्रसादाचे वाटप केले.  त्यानंतर पवमान पंचसूक्तांचा अभिषेक केला.

loading image
go to top