सिद्धनेर्ली करांनी श्रमदानातून पालटले स्मशानभूमीचे रूपडे

Siddhanerli changed the form of the cemetery
Siddhanerli changed the form of the cemetery

सिद्धनेर्ली : येथील गावकऱ्यांनी नदीघाट व स्मशानभूमी परिसर लोकवर्गणी व श्रमदानातून सुशोभीकरण व स्वच्छ केला आहे. 85 झाडेसुद्धा या मार्गाच्या दुतर्फा लावली आहेत. शासकीय मुल्याकंनानुसार साडेतीन लाख रूपयांच्या दरम्यान खर्चाचे असलेले हे काम गावकऱ्यांनी केवळ सव्वा लाख रूपये खर्चात पुर्ण केले. सिद्धनेर्लीकरांच्या या एकजुटीतून साकारलेल्या कामामुळे गाव करील ते राव करील काय ? याचीच प्रचिती आली आहे. 

सिद्धेश्वर जलतरण मंडळाने अध्यक्ष आनंदा घराळ व सरपंच अरूणा पाटील यांच्या पुढाकाराने हे काम पुर्ण केले आहे. स्वामी समर्थ व संत निरंकारी मंडळासह गावातील दीडशेहून अधिक ग्रामस्थांच्या देणगीसह श्रमदानातून या अस्वच्छ असलेल्या परिसराचे रूपडे पालटले आहे. 

येथील नदी घाट या ठिकाणी दूधगंगा नदीवर सकाळी पोहण्यासाठी काही नागरिक जातात. या मार्गावरच येथील स्मशानभुमीही आहे. या परिसरासह या मार्गाच्या दुतर्फा काही ठिकाणी अस्वच्छता व झुडपे वाढलेली होती. या नागरिकांनी ही झुडपे काढून परिसर स्वच्छ करण्यासह सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अंदाजे तीन ते साडेतीन लाख रुपये इतका खर्च अपेक्षित होता. त्यासाठी सिध्देश्वर जलतरण मंडळाची स्थापना झाली. याबाबत एक बैठक घेतली व प्रस्तावित कामासह इच्छुक देणगीदारांनी मदत करण्याबाबत सोशल मीडियावरून आवाहन करण्यात आले.

बघता-बघता सव्वा लाख रूपये इतक्‍या जमा झालेल्या रकमेतून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. यामध्ये हरिजन वाडा ते नदीघाट या रस्त्याच्या दुतर्फा चरी काढल्या. त्यामुळे गटारीचे जागोजागी तुंबणारे पाणी वाहते झाले. स्मशानभुमीसह या चरीतील वाढलेली झाडे झुडुपे काढली. पंच्याऐंशी मोठी झाडे लावून त्यांच्या संरक्षणासाठी काही कंत्राटदारांच्या सहकार्याने पत्र्याची बॅंरेल लावण्यात आली. रोपांना पाण्याच्या व्यवस्थेसाठी ठिबक सिंचन प्रणाली जोडली आहे. वैकुंठ भूमी कमान बांधण्याच्या कामासह परिसर सुशोभीकरण कामास सुद्धा लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे. सिद्धनेर्लीकरांनी लोकवर्गणीसह श्रमदानातून साकारलेले हे काम इतरांनाही प्रेरणादायी आहे. 

लोकांना विश्‍वासात घेतल्याने यशस्वी ...! 
याबाबत "सकाळ'शी बोलताना जलतरण मंडळाचे अध्यक्ष आनंदा घराळ म्हणाले, कागल सारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील तालुक्‍यात नागरिकांना विश्वासात घेऊन लोकवर्गणीच्या रकमेचा विधायक कामासाठी वापर केल्यास गटातटा पलिकडे जाऊन प्रतिसाद मिळतो व आदर्श कामे साकारतात. हे पाणंद रूंदीकरणानंतर या कामातून दाखवून दिले आहे. 

दृष्टिक्षेप 
- गावच्या सुशोभीकरणासाठी लोकवर्गणी काढली 
- साडेतीन लाख खर्चाचे काम, श्रमदानामुळे दीड लाखात पूर्ण 
- रस्त्याच्या दुतर्फा 85 झाडेही लावली 
- स्मशानभूमी परिसरही केला चकाचक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com