

Silver rate outlook for coming days
esakal
Gold Silver Prices : सोने आणि चांदीच्या दरातील वाढ सुरूच आहे. सोमवारी दरवाढीने पुन्हा उसळी घेतली. चांदीच्या दरात दहा हजार रुपयांची, तर सोन्याच्या दरामध्ये दोन हजार तीनशे रुपयांची वाढ झाली आहे. जागतिक मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असल्याने आणि औद्योगिक क्षेत्रात चांदीचा वापर वाढत असल्याने त्यांच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.