

Police Arrest
sakal
कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये चालणाऱ्या गर्भलिंग निदान व गर्भपात केंद्रात पेशंट आणणाऱ्या सहा एजंटांना पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्यांत दोन महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. डॉ. युवराज पाटीलच्या चौकशीत ही नावे उघड झाली होती. कमिशन घेऊन पेशंट गाठून देणाऱ्या एजंटांनाही गुन्ह्यात सहआरोपी करण्यात येणार आहे.