
Prada Company Italy : इटलीमधील प्राडा कंपनीची सहा सदस्यांची ‘टेक्निकल टीम’ आज थेट कोल्हापुरात दाखल झाली. या पथकाने इथल्या उत्पादक, कारागिरांशी संवाद साधत अत्यंत बारकाईने कोल्हापुरी चप्पलची निर्मिती जाणून घेतली व ही हस्तकला पाहून ते भारावून गेले. या भेटीतील पाहणीचा अहवाल हे पथक त्यांच्या बिझनेस टीमला आठवड्याभरात सादर करणार आहे.