esakal | ते सहा जण पुण्यातून आले अन् एकदम झाले बेपत्ता, पोलिस त्यांचा शोघ घेत आहेत...
sakal

बोलून बातमी शोधा

Six persons who came to Belgaum from Pune by special

महापालिकेने त्यांची शोधाशोध सुरू केली आहे. त्यांनी तेथे मोबाईल क्रमांक दिला आहे, पण त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यास ते बंद असल्याचे आढळून आले.

ते सहा जण पुण्यातून आले अन् एकदम झाले बेपत्ता, पोलिस त्यांचा शोघ घेत आहेत...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बेळगाव - विशेष रेल्वेतून पुणे येथून बेळगावात आलेले सहाजण बेपत्ता झाले आहेत. महापालिकेने त्यांचा शोध सुरू केला आहे. पण त्यांनी रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर चुकीचा पत्ता दिल्यामुळे त्यांचा शोध घेण्यात अडचण येत आहे. त्यामुळे आता या सहा जणांच्या विरोधात पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

पत्ता दिला खोटा...

महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्यांसाठी सात दिवसांचे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सक्तीचे आहे. त्यानंतर 14 दिवस होम क्वारंटाईनही केले जाते. महाराष्ट्र वगळता अन्य राज्यातून येणाऱ्यांना थेट होम क्वारंटाईन केले जाते. त्यासाठी रेल्वेस्थानकावर विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. रेल्वेतून बेळगावत दाखल होणाऱ्यांची सविस्तर माहिती घेतली जात आहे. जे महाराष्ट्रातून येतील त्याना कुमार गंधर्व रंगमंदीर येथे जावून इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगीतले जाते. उर्वरीत सर्वांनाही रंगमंदीरात गेल्यानंतर आरोग्य तपासणीनंतर होम क्वारंटाईन केले जाते. शनिवारी पुणे येथून सहाजण बेळगावात दाखल झाले आहेत. रेल्वे स्थानकावर त्यांची नोंद झाली आहे. स्थानकावरून त्यांची माहिती महापालिकेला देण्यात आली आहे. पण ते सहाजण कुमार गंधर्व रंगमंदीरात गेलेच नाहीत. त्यामुळे मग महापालिकेने त्यांची शोधाशोध सुरू केली आहे. त्यांनी तेथे मोबाईल क्रमांक दिला आहे, पण त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यास ते बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे मग त्यानी दिलेल्या पत्त्यावर त्यांचा शोध घेण्यात आला. त्यावेळी तो पत्ता संबंधितांचा नसल्याचे आढळून आले. त्यामुळे क्वारंटाईन प्रक्रियेची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आधी त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंदविण्याचा निर्णय घेतला. पण तो निर्णय बदलून ते सहाजण बेपत्ता असल्याची तक्रार देण्याचे ठरविण्यात आले आहे.

वाचा - तिचं तोंड घागरीत अडकलेलं, दुधासाठी तीची पाच पिल्ली तडफडू होती... मग त्या दोन युवकांनी केली अशी कमाल...

परराज्यातून बेळगाव किंवा कर्नाटकात येण्यासाठी आता रेल्वेचा पर्याय उपलब्ध आहे. रेल्वेतून येणाऱ्यांसाठी कर्नाटक सरकारने सेवा सिंधू या मोबाईल ऍप्लीकेशनवर नोंदणी सक्तीची केली आहे. रेल्वेतून येणाऱ्यांची योग्य नोंदणी व त्यांचे काटेकोर क्वारंटाईन व्हावे यासाठी प्रशासनाचा प्रयत्न सूरू आहे. पण काहीजण प्रशासनाच्या तावडीत सुटका करून घेण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवित आहेत. खासकरून महाराष्ट्रातून येणाऱ्यांनी सात दिवसांचे क्वारंटाईन चुकविण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच प्रत्यय शनिवारी महापालिका प्रशासनाला आला. विनापरवाना राज्यात दाखल होणाऱ्यांवर किंवा क्वारंटाईन प्रक्रिया चुकविणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद आहे. याआधी सदाशिवनगर येथील कोरोनाबाधीत महिलेच्या कुटुंबियांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तरीही प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार सुरूच आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भितीही व्यक्त केली जात आहे. महापालिका व आरोग्य यंत्रणा गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधासाठी झटत आहे. पण नागरीकांकडून सकात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया आहे.

loading image
go to top