esakal | तिचं तोंड घागरीत अडकलेलं, दुधासाठी तीची पाच पिल्ली तडफडत होती... मग त्या दोन युवकांनी केली अशी कमाल...
sakal

बोलून बातमी शोधा

Two young men rescued the dog in utur kolhapur

प्राणी मत्रांवर दया करा असं संतानी सांगुन ठेवलंय. पण मानव जात हे विसरुन प्राण्यांना त्रास देण्यात आघाडीवर असल्याचे चित्र अनेकदा दिसुन आले आहे.नुकतेच केरळ मधील गर्भवती हत्तींनीला मनुष्य कृती मुळे जीव गमवावा लागला,याचे पडसाद सोशल मिडियावर देशभर दिसले.औरंगाबात येथे ही कुत्र्याला मोटारसायकला बांधून फरफटत नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असतानाच आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे पण एका कुत्रीला युवकांनी जीवनदान दिल्याची ही घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे...

तिचं तोंड घागरीत अडकलेलं, दुधासाठी तीची पाच पिल्ली तडफडत होती... मग त्या दोन युवकांनी केली अशी कमाल...

sakal_logo
By
अशोक तोरस्कर

उतूर (कोल्हापूर) - तहानेन ती व्याकुळ झाली. अर्धवट भरलेल्या पाण्याच्या घागरीत तिने तोंड घातले. पोटभर तिला पाणी मिळाल पण घागरीतून तोंड निघेना.  तिला पुढचे काही दिसेना घागर गळ्यात अडकूनच ती वाट फुटेल तिकडे पळू लागली. ती गोबर गॅसच्या खड्यात पडली. तिला त्यातून काढण्यात आले. आईच्या दुधासाठी तीची पाच पिल्ली तडफडू लागली. युवकानी तिच्या गळ्यातील घागर काढण्याचा निर्णय घेतला. कुत्रीने दोन युवकांच्या हाताचा व पायाचा चावा घेतला. मात्र त्यानी प्रयत्न सोडला नाही. शेवटी अथक प्रयत्नातून तिच्या गळ्यातील घागर काढण्यात यश आले. आणि थोड्या वेळानी तिची पिल्ली तिला जावून बिलगली.

धडपड  तिच्या पिल्यासाठी...

उतूर (ता.आजरा ) येथील बाजार पेठेत एका भटक्या  कुत्रीच्या गळ्यात पाणी पीत असताना प्लास्टिकची घागर अडकली. घागर घेवून ती सैरावैरा धावत सुटली. या कुत्रीने  नुकतेच पाच पिलाना जन्म दिला होता. आईच्या दुधावाचून ती तडफडायला लागली. त्यांची तडफड युवकाना पहावेना त्यानी कुत्रीला पकडून घागर काढण्याचा निर्णय घेतला. मात्र तिला पकडताना तिच्या पायाच्या नख्या हाताला जखम करु लागल्या. एकवेळ तिच्या अंगावर मच्छरदाणी टाकून तिला पकडण्याचा प्रयत्न झाला. अर्धी घागर कापली मात्र कुत्री घडपडायला लागली  आणि मच्छरदानी फाडून पळून गेली.गेली पंधरा दिवस  हे प्रयत्न सुरु होते. आज पुन्हा ती एका पहिल्या मजल्यावर बसल्याची युवकाना दिसली. तिला आज पकडून तिच्या गळ्यातील घागर काढायची असा चंग युवकानी बांधला.

हे पण वाचा - 'त्यांचा' प्रेम विवाह झाला, ते सारे मोरपंखी दिवस अन् नियतीने घाला घातला पण पतीला तिने परत ऊभा केलं...

यासाठी गोणपाट गोळा केले.जिण्यावरुन जावून तिला पकडले व रस्त्यावर आणले.तिच्या गळ्यातील घागर काढण्याचा प्रयत्न केला मात्र घागर काही निघेना शेवटी घागर कापण्याचा निर्णय झाला. हे प्रयत्न चालू असताना एका युवकाच्या हाताला तर दुस-याच्या पायाचा चावा घेतला. नख्यानी ओरखडे काढले. मात्र युवकानी हार मानली नाही.शेवटी अथक प्रयत्नानंतर घागर निघाली . थोड्या वेळानी ती पिलांजवळ गेली. पिल्ली तिला बिलघली आणि पिलांना आई मिळाल्याचे समाधान युवकांच्या चेह-यावर दिसू लागले.

 कुत्री चावलेल्या महादेव मोरवाडकर  व सुरज रक्ताडे यांचेवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. दिपक देशमाने यानी घागर काढण्यासाठी पुढाकार घेतला.
 

go to top