Cigarettes to Get Costlier as New Excise Duty Imposed

Cigarettes to Get Costlier as New Excise Duty Imposed

esakal

Cigarette Price Hike News : सिगारेटचे चटके ओठाला नाही खिशाला बसणार, नवीन उत्पादन शुल्क लागणार

New Excise Duty Cigarettes : सिगारेट ओढणाऱ्यांसाठी वाईट बातमी! सरकारने सिगारेटवर नवीन उत्पादन शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्याने सिगारेटचे दर वाढण्याची शक्यता आहे.
Published on

Government Tax On Tobacco : सिगारेट ओढणे केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर खिशालाही महागात पडणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने सिगारेट, तंबाखू आणि पानमसाल्यावर कराचा बोजा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ४० टक्के जीएसटी लागू असलेल्या सिगारेटवर आता स्वतंत्र उत्पादन शुल्कही आकारले जाणार आहे.

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार १ फेब्रुवारीपासून सिगारेटच्या लांबीनुसार प्रति हजार काड्यांवर २,०५० रुपये ते ८,५०० रुपये इतके नवीन उत्पादन शुल्क लागू होणार आहे. हा कर सध्याच्या जीएसटीव्यतिरिक्त असेल. यामुळे सिगारेटवरील एकूण करभार लक्षणीय वाढणार असून त्याचा थेट परिणाम किमतींवर होणार आहे.

सध्या भारतात सिगारेटवर साधारणतः ५३ टक्के कर आकारला जातो, जो जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने सुचवलेल्या ७५ टक्के मानकांपेक्षा कमी आहे. ही तफावत भरून काढण्यासाठी आणि तंबाखू सेवनामुळे होणारे आरोग्यविषयक नुकसान कमी करण्यासाठी उत्पादन शुल्क वाढवण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

दरम्यान, डिसेंबर २०२४ मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक २०२५ मंजूर करून सिगारेट आणि तंबाखू उत्पादनांवरील तात्पुरत्या आकारण्या रद्द केल्या होत्या. त्या ऐवजी कायमस्वरूपी कररचना लागू करण्यात आली असून, त्याचाच भाग म्हणून हे नवीन उत्पादन शुल्क आकारले जात आहे.

किंमती वाढणार, उद्योगांवर परिणाम

या निर्णयामुळे सिगारेटच्या किमती वाढणार असून देशभरातील लाखो धूम्रपान करणाऱ्यांना आर्थिक झळ बसणार आहे. तसेच आयटीसी, गॉडफ्रे फिलिप्स इंडिया यांसारख्या प्रमुख सिगारेट उत्पादक कंपन्यांच्या विक्री आणि नफ्यावरही दबाव येण्याची शक्यता आहे. मात्र जास्त कर लादून तंबाखू सेवन कमी करणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्याचा सरकारचा उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

‘सिन टॅक्स’चा बोजा वाढणार

आतापर्यंत तंबाखू आणि सिगारेटवर जीएसटी आणि भरपाई उपकर अशा दोन प्रकारे कर आकारला जात होता. तंबाखू उत्पादनांना ‘सिन टॅक्स’ म्हणजेच व्यसनाधीन व आरोग्यास घातक वस्तूंच्या श्रेणीत टाकण्यात आले आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच इतर वस्तूंच्या तुलनेत त्यांच्यावर जास्त कर लादला जात आहे. जीएसटीमुळे झालेल्या महसुली नुकसानाची भरपाई करण्यासाठी राज्यांवर उपकरही आकारण्यात आला होता. आता या सर्वांमध्ये उत्पादन शुल्काची भर पडल्याने सिगारेटवरील कराचा एकूण बोजा आणखी वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com