धक्कादायक! चक्क फ्रीजखाली बसला होता नाग, पाहिला अन् बोबडीच वळली

नाग पकडल्यानंतर तो पाहण्यासाठी नागरिक जमले होते
धक्कादायक! चक्क फ्रीजखाली बसला होता नाग, पाहिला अन् बोबडीच वळली

मुरगूड (कोल्हापूर) : येथील जवाहर रोडवरील एका घरात फ्रीजखाली (refregerator) बसलेला साडेचार फुटांचा नाग (snake) सर्पमित्राने पकडला. बघताक्षणी भीतीने गाळण उडवणारा साडेचार फुटी नाग जवाहर रोडवरील (javahar nagar kolhapur) जगदीश पाटील यांच्या घरात फ्रीजखाली बसला होता. या कॉलनीत शेजारी चार कुटुंबे आहेत. तेथे लहान मुले खेळत असतात. अशा ठिकाणी नाग बसला होता.

नाग असल्याचे लक्षात येताच शेजारी राहणाऱ्या दीपक बहुधान्ये यांनी सर्पमित्र सुशांत कलकुटकी यांना बोलवून घेतले. सुशांत यांनी हा नाग अवघ्या 10 मिनिटांत आकडीच्या साहाय्याने पकडला. नाग पकडल्यानंतर तो पाहण्यासाठी नागरीक जमले होते. वनखात्याने निर्दिष्ट केलेल्या जंगलात नागराजाला सुरक्षितरीत्या सोडले. शेजारी शेती असल्याने यापूर्वीदेखील कॉलनीत पाच सहा साप सर्पमित्रांनी पकडले आहेत.

धक्कादायक! चक्क फ्रीजखाली बसला होता नाग, पाहिला अन् बोबडीच वळली
मराठा समाजाचा राष्ट्रासाठी त्याग; संभाजीराजेंचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांना पत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com