Kolhapur : सामाजिक उपक्रम अनुकरणीय ; डॉ. मृणालिनी फडणवीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामाजिक उपक्रम अनुकरणीय ; डॉ. मृणालिनी फडणवीस
सामाजिक उपक्रम अनुकरणीय ; डॉ. मृणालिनी फडणवीस

सामाजिक उपक्रम अनुकरणीय ; डॉ. मृणालिनी फडणवीस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘शिवाजी विद्यापीठाने सामाजिक दायित्वाच्या भावनेतून राबविलेले उपक्रम अनुकरणीय आहेत,’ असे मत सोलापूर येथील अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या ५९ व्या वर्धापन दिन समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी, तर प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.

या वेळी गुणवंत शिक्षकाचा पुरस्कार वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख डॉ. एस. एस. महाजन, बॅरिस्टर पी. जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील डॉ. अनिलकुमार कृष्णराव वावरे यांना, तर प्राचार्य सुमतीबाई पांडुरंग पाटील आदर्श शिक्षिका पुरस्कार कासेगाव (जि. सांगली) येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या डॉ. तेजस्विनी दीपक पाटील-डांगे यांना देण्यात आला. राजर्षी शाहू सभागृहात कार्यक्रम झाला.

दि न्यू कॉलेज व भोगावती महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा सत्कार झाला. उत्कृष्ट अधिविभागासाठी वनस्पतीशास्त्र अधिविभागाला,  तर अन्य अधिविभागांतून अर्थशास्त्र अधिविभागाला दिला. राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता विद्यार्थी सौरभ संजय पाटील, कुलपती सुवर्णपदक विजेती विद्यार्थिनी महेश्वरी धनंजय गोळे यांचाही गौरव करण्यात केला. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. नंदिनी पाटील व सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले.

विविध पुरस्कार विजेते

गुणवंत सेवक : स्वाती खराडे (सीनिअर सिस्टीम अॅनालिस्ट), फिरोज नायकवडी (सहायक अधीक्षक), अजय ऊर्फ आप्पासाहेब आयरेकर (कनिष्ठ सहायक) बबन चौगले (प्रयोगशाळा परिचर). महाविद्यालय गुणवंत प्राचार्य : डॉ. मोहन राजमाने (एस. जी. एम. कॉलेज, कराड), डॉ. रमेश कुंभार (विवेकानंद कॉलेज), गुणवंत सेवक : जयंतराव कदम (कनिष्ठ लेखनिक, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पलूस, जि. सांगली), विजयकुमार लाड (ग्रंथालय परिचर, शहाजी छत्रपती महाविद्यालय), बॅरिस्टर पी. जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार :  डॉ. अनिलकुमार वावरे (छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा), प्राचार्य सुमतीबाई पाटील आदर्श शिक्षिका : डॉ. तेजस्विनी पाटील-डांगे (आर्टस्‌ अँड कॉमर्स कॉलेज, कासेगाव, जि. सांगली).

loading image
go to top