गोंधळातून समाज प्रबोधन करणारा गोंधळी 

 Social mobilization in flock artist
Social mobilization in flock artist

पिंपळगाव (कोल्हापूर) - गळ्यात संबळ, काखेला झोळी आणि डोईवर बलुत्याचं गाठोडं घेऊन गोंधळी समाज पिढ्यानपिढ्या गावोगाव गोंधळ मांडत राहिले. मुलभूत सोई सुविधांपासून हा समाज खूपच मागे राहिलाय. आजही हे भटके अनेक मुलभूत समस्यांच्या विळख्यात असल्याने नवी पिढी अन्य व्यवसायात वळली आहे. 

छत्रपती शिवरायांच्या काळात गोंधळी समाज लोकांच्या समोर पोवाडे गाऊन राष्ट्रभक्ती व धर्मभक्ती याचे महत्त्व सांगत. समाजातील वाईट चालीरितींचा प्रभाव कमी करण्याचा ते प्रबोधनातून प्रयत्न करीत. तुळजाभवानी देवीचा गोंधळ मांडणारा गोंधळी समाज आजही अनेक अडचणी सोबत घेऊन पिढीजात व्यवसायात टिकवण्याचा प्रयत्न करीत आहे. गोंधळी समाज गावोगाव गोंधळ पुजा मांडून बलुत्याच्या आधारावर आपले कुटूंब सांभाळतात.

लग्न कार्यात कुलस्वामीनीची पुजा, गोंधळ मांडण्याची परंपरा आहे. हा गोंधळ गोंधळी समाजातील लोककलाकार मांडतात. संबळ हे त्यांचे मुख्य वाद्य. सोबत तुणतुण्याच्या वाद्याबरोबर साथसंगत देणारा एक सहकलाकार गोंधळ पुजा करतांना असतो. विशेषतः पाच दिवट्या प्रज्वलीत करुन दिवट्या नाचवण्याची प्रथा आहे. यावेळी गोंधळी हा लोककलाकार देवीची भक्ती गीते, लोककथा, प्रबोधनात्मक रचना ऐकवतो. यात्रा जत्रा काळात भवानी, आंबाबाई देवीचे जागर मांडले जातात, अशावेळी गोंधळी रात्रभर देवीचा जागर करतांना प्राचिन कथा संबळाच्या तालवर ऐकवतात. 

गणेश चतुर्थीला आपल्या ठरलेल्या गावी गोंधळी प्रत्येक घरात जाऊन गणेश आरती गातो. गोंधळी लोककलाकारांची परंपरागत वतन गावे ठरलेली आहेत. सुगीच्या हंगामात गावकरी तुळजाभवानीच्या या पुजाऱ्याला बलुतं देतात. हे बलुतचं गोंधळ्याचा जीवन आधार ठरतो. पुर्वीप्रमाणे लग्नाच्या गोंधळाला गोंधळ मांडण्यासाठी लोक बोलवत नाहीत. जेथून बोलावणे येईल, त्या गावी गोंधळी गोंधळ पुजायला जातात. 

काहि लोक "यादीपे शादी' विवाह पध्दती स्विकारत आसल्यांने अशा गडबडीच्या लग्नात गोंधळी लोककलाकाराला बोलावले जात नाही. पिढीजात व्यवसाय म्हणून ते देवीची पूजा अर्चा गोंधळ विधी करतात. मात्र महागाईमुळे मिळणाऱ्या बलुत्यावर कुटूंब चालवतांना त्यांना कसरत करावी लागते . 

बदलत्या काळाबरोबर गोंधळी समाजही आत्ता बदलू लागला आहे. नव्या पिढीतील मुले शैक्षणिक प्रवाहात आली आहेत. परंपरागत गोंधळ मांडाण्याच्या चौकानात आडकून न रहाता ही मुले मिळेल तो रोजगार स्विकारुन अन्य नोकरी, व्यवसायात स्थिरावत आहेत. 

मी गेली वीस वर्षे गोंधळ मांडण्याचे परंपरागत काम करतो. माझा मुलगा बी.ई.पर्यंत शिकला असून नवी पिढी परंपरागत कामे करण्यास तयार नाही. गोंधळ विधी हेच आमच्या उपजिविकेचे साधन आहे. 
- महादेव दत्तात्रय गोंधळी, किल्ले भुदरगड (पेठशिवापूर ) 

कोट 
आमच्या लहानपणी म्हाईच्या जागराला भुदरगडचे गोंधळी देवीचा गोंधळ पुजून रात्रभर कथा सांगायचे. गोंधळ गीत,गोंधळ कथेत प्राचिन देव देवतेंच्या कथा ऐकवल्या जात.त्या संवादात्मक होत्या. हल्ली असे अभ्यासू गोंधळी भेटत नाहीत. 
-जयराम तुकाराम पाटील, माजी सरपंच, मुरुक्‍टे . 

फोटो ओळ- 
लग्नातील गोंधळ सादर करतांना महादेव गोंधळी. 
(छायाचित्र ः आतिष मोरे) 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com