Kolhapur : प्रेमसंबंधाच्या संशयावरून सॉफ्टवेअर अभियंत्यावर खुनी हल्ला; पोटात भोसकला चाकू, रक्ताच्या थारोळ्यात श्रीनाथ पडला अन्...

Gokul Shirgaon Police : एका महिलेशी प्रेमसंबंधाच्या (Love Affair) संशयावरून श्रीनाथ बाप्पा मेलकेरी (वय २७) याच्यावर येथे मंगळवारी रात्री खुनी हल्ला झाला.
Kolhapur Crime News
Kolhapur Crime Newsesakal
Updated on
Summary

शुभमने चाकूने श्रीनाथच्या पोटात भोसकले. तो खाली पडला असताना त्याच्या चेहऱ्यावर, मानेवरही वार करण्यात आले. श्रीनाथ आरडाओरडा करू लागल्याने त्याची आई धावत आली. त्यांना पाहून हल्लेखोर पसार झाले.

गोकुळ शिरगाव : एका महिलेशी प्रेमसंबंधाच्या (Love Affair) संशयावरून श्रीनाथ बाप्पा मेलकेरी (वय २७) याच्यावर येथे मंगळवारी रात्री खुनी हल्ला झाला. धारदार चाकूने त्याच्या पोटात भोसकण्यात आले असून, मानेवरही खोलवर वार आहेत. त्यात श्रीनाथ गंभीर जखमी झाला आहे. त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. रात्री दहाच्या सुमारास घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी (Gokul Shirgaon Police) संशयित शुभम झाडे आणि साहिल वाघमारे या दोघांना अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com