Shirala News : शिराळा तालुक्यात ७० टक्के क्षेत्रावर पेरण्या; भात पिकाची चांगली उगवण

Shirala Farmer News : हा पाऊस पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना उपयुक्त असतो. शिवाय जनावरांना ओला चाराही मिळतो.
शिराळा तालुक्यात ७० टक्के क्षेत्रावर पेरण्या
शिराळा तालुक्यात ७० टक्के क्षेत्रावर पेरण्याSakal
Updated on

शिराळा : तालुक्यात एकूण खरीप क्षेत्र २० हजार ६०५ हेक्टर असून त्या पैकी १४ हजार ६१८ हेक्टरवर, म्हणजे ७० टक्के पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित ठिकाणी पेरण्याची कामे सुरू आहेत. बळीराजा चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. शिराळा हा अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो.

मेअखेरीस तालुक्यात धूळवाफ पेरण्या केल्या जातात. तत्पूर्वी मार्च-एप्रिलपासून अधून-मधून वळवाचा पाऊस हजेरी लावतो. हा पाऊस पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना उपयुक्त असतो. शिवाय जनावरांना ओला चाराही मिळतो. साधारणपणे गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर मशागतीच्या कामांना सुरवात होते.

अधून-मधून वळवाच्या पडणाऱ्या पावसाने शेतीची मशागत करणे शेतकऱ्यांना सोपे जाते. रानात, शेताच्या बांधावर गवत उगवण्यास सुरवात झाल्याने काही प्रमाणात चाऱ्याचा प्रश्नही मार्गी लागतो. या चाऱ्यामुळे उन्हाळी सुक्या चाऱ्याची बचत होऊन तो पावसाळ्यात वापरण्यास मदत होते.

त्यामुळे शेतकऱ्यांची चाऱ्यावर होणाऱ्या आर्थिक गुंतवणुकीत बचत होते. मात्र गत वर्षी वळवाच्या पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजाचे शेती व्यवस्थापनाचे वेळापत्रकच बदलून गेले होते. या वर्षी वळवाचा पाऊस अपेक्षेप्रमाणे झाल्याने धूळवाफ पेरण्या ७० टक्के झाल्या आहेत.

मृग नक्षत्राला चांगला पाऊस झाल्याने ज्यांनी धूळवाफ पेरणी केली, त्यांच्या भात पिकाची उगवण चांगली झाली आहे. पाऊस पडल्याने काही ठिकाणी घात नसल्याने पेरण्या मागास राहिल्या आहेत.

आता चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने ज्यांच्या शेतात घाती आल्यात, त्या ठिकाणी पेरणीची धांदल सुरू आहे. मात्र काही ठिकाणी अधून-मधून पावसाच्या सरी पडत असल्याने पेरणीत काही ठिकाणी व्यत्यय येत आहे. शिराळा उत्तर भागात १० दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पाऊस झाला. अनेक ठिकाणी शेताचे बांध फुटून गेले. त्यामुळे शेतात माती साचून राहिल्याने दुबार पेरणीचे संकट आले आहे.

शिराळा तालुक्यात ७० टक्के क्षेत्रावर पेरण्या
Sangli News : सहकारी संस्थांच्या निवडणुकांना तीस सप्टेंबरपर्यंत स्थगिती

पिकांचे एकूण क्षेत्र, झालेली पेरणी

  • भात ११,५०० हेक्टर - झालेली पेरणी-८६७४ (७५ टक्के)

  • सोयाबीन ४६०० - हेक्टर - झालेली पेरणी-३१८५ (६९टक्के )

  • भुईमूग ४१०० - हेक्टर - झालेली पेरणी-२६७२ (६५ टक्के)

  • मका २५० - हेक्टर - झालेली पेरणी-५२ (२० टक्के)

  • नाचणी १२५ - हेक्टर - झालेली पेरणी-३५ (२८ टक्के )

शिराळा पश्चिम भागात अधून-मधून पावसाच्या सरी येत असल्याने त्या ठिकाणी धूळवाफ पेरणी केलेल्या भात पिकांची उगवण चांगल्या प्रकारे झाली आहे. १० दिवसांपूर्वी उत्तर भागात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने पेरणी केलेल्या शेतीचे काही ठिकाणी नुकसान झाले. त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांची दुबार पेरणी केलेली पिके उगवू लागली आहेत. तालुक्यात ७० टक्के पेरणी झाली आहे. उर्वरित ठिकाणी पेरणी सुरू आहे.

- सुभाष घागरे, कृषी अधिकारी, शिराळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com