सोयाबीनच्या दरात 700 रुपयांनी घसरण

Soybean Prices Fall By Rs 700 Kolhapur Marathi News
Soybean Prices Fall By Rs 700 Kolhapur Marathi News

 नूल : चालू वर्षी सोयाबीन पिकाला गरजेइतका पाऊस झाल्याने पीक जोमाने आले आहे. कापणी व मळणीनंतर सोयाबीनचा उतारा चांगला पडत आहे; मात्र तीन महिन्यांत सोयाबीनचा दर सातशे रुपयांनी खाली येऊन 3750 वर येऊन ठेपला असल्याने शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. चालू वर्षी खरीप हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी सोयाबीनचा दर प्रति क्विंटलमागे 4500 इतका होता. सध्या सर्वत्र सोयाबीन पिकाची काढणी आणि मळणीची कामे जोरात सुरू आहेत.

चालू वर्षी सोयाबीन पीक जोमाने आले आहे. उताराही चांगला मिळत आहे. एकरी 11 ते 12 क्विंटल असा उतारा आहे; पण सध्या प्रति क्विंटल सोयाबीनचा दर 3750 इतका घसरला आहे. त्यामध्ये दहा किलो हवा म्हणजे प्रति क्विंटलला दहा किलो काढून सोयाबीन खरेदी करत आहेत. पिकाच्या पेरणीपासून बियाणे, काढणीचा खर्च एकरी 3000 दरम्यान आहे.

मळणी मशिनमालक प्रति पोत्यामागे आठ किलो भाडे घेत आहेत. प्रति क्विंटल दहा किलो हवा काढून सोयाबीन खरेदी करीत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातामध्ये नेमके किती पैसे पडणार हा मोठा प्रश्‍न आहे. सोयाबीन काढणीच्या हंगामात दर खाली आल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने सोयाबीनचा दर नियंत्रित करून द्यावा, अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com