
कोल्हापूर : चोरीची दुचाकी विकताना सापडले जाण्याच्या भीतीने महागडे स्पेअर पार्ट काढून दुचाकी नदीत, विहिरीत फेकणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. वैभव यशवंत माने (वय २८, मूळ रा. कुरळप, ता. वाळवा, सांगली, सध्या रा. शिये, ता. करवीर) व दीपक दादासाहेब शिसाळ (३१, रा. विठ्ठलनगर, शिये, करवीर) अशी संशयितांची नावे आहेत. शियेतील विहिरीत त्यांनी टाकलेले दुचाकींचे सांगाडे पोलिसांनी बाहेर काढले. दोघांच्या चौकशीत आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.