महादेव मंदिर : गंगावेसचा आध्यात्मिक वारसा!

special article of uday gaikwad on the heritage of kolhapur from kolahpur
special article of uday gaikwad on the heritage of kolhapur from kolahpur

कोल्हापूर : महादेवाच मंदिर तसं अगदी लहान आणि साधं आहे. ते फारसं प्राचीन नाही. मंदिराबाहेर शिवलिंग आणि नंदी आहे. गाभाऱ्यात मारुती, शेषशायी विष्णू, शंकर पार्वतीसह गणपती, कमला लक्ष्मी देवीची मूर्ती आहे. यापैकी विष्णूची मूर्ती ही सध्याच्या शुक्रवार पेठेतील धर्मशाळा परिसरात म्हणजेच पंचगंगा हॉस्पिटलचा पाया खणताना आढळली होती. ती शेषशायी असून, सध्या गंगावेस येथील मंदिरात ठेवण्यात आली. त्याचा उल्लेख करवीर महात्मामध्ये आश्वथ तीर्थ म्हणून आहे.

इरून फिरून गंगावेसीत असा वाक्‍य प्रचार कोल्हापुरात अनेकांच्या तोंडी आहे. अनेक रस्ते जिथे एकत्र पोचतात असं हे ठिकाण. गणपतीची मिरवणूक असो किंवा कोणाची अंत्ययात्रा, आता शेवटचा टप्पा आला याची जाणीव होते ते हे ठिकाण म्हणजे गंगावेस. नदीकडून, पन्हाळ्याकडून येणारा जुना रस्ता या वेशीतून तटबंदीच्या आत येत होता. शहराच्या सहा वेशीपैकी एक वेश आहे. वेशीला दरवाजांनी भक्कम बुरुज, बाहेर खंदक होता. त्याला लागून कुंभार तळे (ऋण मोचन तीर्थ) जिथे आज शाहू उद्यान आहे.

पहिले एसटी स्टॅंड इथेच सुरू झालं होत. या चौकात पूर्व बाजूच्या रस्त्यालगत खर तर रात्र दिवस म्हशीचे दूध कासंडीत काढून, फेसासह भरलेला दुधाचा पेला पुढं करणारी मंडळी ‘ह... या इकडं’ म्हणून आवाज देतात. धारोष्ण दूध मिळणारा हा दूध कट्टा एक महत्त्वपूर्ण वारसा कोल्हापूरला आहेच. त्याचबरोबर कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेली गंगावेस तालीम पश्‍चिम दिशेला आहे.

चौकात मध्यभागी अगदी छोटं मंदिर आहे. महादेवाच मंदिर तसं अगदी लहान आणि साधं आहे. ते फारसं प्राचीन नाही. मंदिराबाहेरचं शिवलिंग आणि नंदी आहे. गाभाऱ्यात मारुती, शेषशायी विष्णू, शंकर पार्वतीसह गणपती, कमला लक्ष्मी देवीची मूर्ती आहे. यापैकी विष्णूची मूर्ती ही सध्याच्या शुक्रवार पेठेतील धर्मशाळा परिसरात म्हणजेच पंचगंगा हॉस्पिटलचा पाया खणताना आढळली होती. ती शेषशायी असून, सध्या गंगावेसीतील मंदिरात ठेवण्यात आली. त्याचा उल्लेख करवीर महात्मामध्ये आश्वथ तीर्थ म्हणून आहे. अंतरगृही चतुर्थ जलशाई यात्रा करताना शुक्रवार पेठेतील पिंपळाच्या झाडाखाली या शेषशायी विष्णूचे दर्शन घेतले जाते असा उल्लेख येतो.  

बाहेर एक वीरगळ दिसते. मंदिराबाहेर एक गणपतीची मूर्ती आहे. उद्यानाच्या मागील बाजूस ऋण मुक्तेश्वर मंदिर व ऋणमोचन तीर्थ आहे. तेही करवीर महात्मामध्ये उल्लेखलेले ठिकाण आहे. मंदिराच्या पश्‍चिम बाजूला, गंगावेस तालिमीच्या शेजारी कृष्ण सरस्वती महाराजांची मठी आहे. १८३६ ते १९०० असे कृष्ण सरस्वती महाराजांचे वास्तव्य असताना त्यांनी आराधनेचा भाग म्हणून अखंड वीणा वादन सुरू केले. जोवर वीणा वादन सुरू आहे, तोवर मी आहे या त्यांच्या विधानावरून गेल्या १२५ वर्षांपेक्षा अधिक काळ रात्र दिवस भक्त असलेली कोणीही एक व्यक्ती ही वीणा वादन करण्यासाठी उभी आहे. ही वीणा आजवर खाली ठेवली नाही.

अगदी लॉकडाउनच्या काळातही खंड पडला नाही. खरतर एखाद्या विश्व विक्रमाला लाजवेल असा हा श्रद्धेचा जागर आहे. छत्रपतींच्या निगराणीने उभी असलेली ही वास्तूही एक भिन्न असा आदर्श वारसा आहे. याच परिसरात दक्षिणेला कृष्ण सरस्वती महाराजांची आणखी एक मठी शिर्के यांच्या घरामध्ये आहे. शहरातील प्राचीन असलेले रुपनारायण मंदिर हे जैन मंदिर आहे. उत्तरेश्वराचे मंदिर हे प्राचीन मंदिर आहे.

शंकराचार्य मठ आणि दुधाळी मैदान यामध्ये संजीवनी व मयूरी नद्यांच्या संगमावर हे मंदिर आहे. खूप मोठ्या आकाराचे शिवलिंग इथे आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे या मंदिराच्या परिसरात रहात होते. अनेक दिशेने वारसा घेऊन येणार हे ठिकाण समूह स्वरूपात, वारसा मूल्ये जोपासत राखले पाहिजे. लोकजीवनातून निर्माण झालेला वारसा वास्तुशी जोडल्याने तो अधिक घट्ट होतो. म्हणूनच हे वारशाचे संमिश्र उदाहरण टिकवले पाहिजे.

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com