
१०१ नंबरशी घरोब्याचा संबंध आहे. अंकांची बेरीज दोन येते, ही बाब त्यांच्या लेखी महत्त्वाची आहे.
101 चं याडचं भारी ; मानसिंगरावांची नित्य सवारी...!
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ उदयसिंहराव गायकवाड यांचा बालेकिल्ला. ते १९६२ ते १९८० पर्यंत विधान परिषदेचे सदस्य होते. त्यांचा लोकसभेच्या रणांगणात १९८० पासून प्रवास सुरू झाला. ते पाच वेळा खासदार झाले. मानसिंगराव गायकवाड हे त्यांचे पुत्र. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. त्यांचा १०१ नंबरशी घरोब्याचा संबंध आहे. अंकांची बेरीज दोन येते, ही बाब त्यांच्या लेखी महत्त्वाची आहे.
हेही वाचा - रेडिरेकनर वाढल्याने पन्हाळा तालुक्यातील शेतीचे दर इतके वाढणार
उदयसिंहराव गायकवाड यांचा जन्म १९३० चा. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ त्यांनी अनुभवला होता. अंगात नेहरू शर्ट व तुमान, टोकदार मिशी, पिळदार शरीरयष्टी ही त्यांची प्रतिमा. कोल्हापुरातल्या मतदारांत ती नेहमीच चर्चेची राहिली. विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी राजकारण अनुभवले होते. जिल्ह्यातील सुपात्रेसारख्या खेडेगावातून त्यांनी राजकारणाची बांधणी केली. पहिल्याच निवडणुकीत त्यांना यश आले. तेथून पुढे त्यांना मतदारांनी डोक्यावर घेतले. पाच वेळा खासदार म्हणून त्यांना कामाची संधी दिली.
अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, ब्राझील, डेन्मार्क, फ्रान्समध्ये भारताचे नेतृत्वही केले. मंत्रिपदाची धुराही वाहिली. त्या काळात जनसंपर्कासाठी त्यांच्याकडे वाहने होती. त्यांचे नंबर मात्र एकसारखे नव्हते. समाजकारणातून राजकारणाचा वसा घेतलेल्या मानसिंगराव गायकवाड यांनी ही प्रथा पाडली. त्यांनी खूप वर्षांपूर्वी सफारीची खरेदी केली. त्या गाडीला १०१ क्रमांक दिला. तो त्यांच्या भविष्याला वलय प्राप्त करून देणारा ठरला. त्यांच्या वाट्याला वेगवेगळी पदे आली. जिल्हा बॅंकेचे संचालक ते तीन वेळा झाले. पैकी एकदा त्यांची बिनविरोध निवड झाली. बॅंकेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी पेलली. त्यांच्या पत्नी शैलजादेवी गायकवाड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती राहिल्या. त्यांना जिल्हा परिषदेत दोन वेळा सदस्यत्वाची संधी मिळाली.
हेही वाचा - मराठा आरक्षण; 55 हजार मराठा तरूण-तरूणींचा जीव टांगणीला
गायकवाड यांनी उदयसिंहराव गायकवाड सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून कार्यविस्तार वाढवला. घरात नव्या गाड्यांची खरेदी होताच प्रत्येक गाडीला १०१ नंबर घेतला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली. मुलगा रणवीरसिंह छत्रपती शाहू विद्यालयाचे विद्यार्थी. पाचगणीच्या संजीवन विद्यालयातही ते शिकले. शालेय राष्ट्रीय स्तरावर ते चार वेळा खेळले. वाणिज्य शाखेचे पदवीधर असणारे रणवीरसिंह सध्या कारखान्याचे संचालक आहेत. शिवसेनेच्या उमेदवारीवर त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. मानसिंगराव गायकवाड म्हणतात, ‘घरात आम्ही कोणतीही गाडी खरेदी करू. त्याकरिता १०१ क्रमांक घेतो. या नंबरची ख्याती शाहूवाडी मतदारसंघात आहे. काही कार्यकर्ते या नंबरच्या प्रेमातच पडले आहेत.’
संपादन - स्नेहल कदम
Web Title: Special Story Four Wheeler Car And Its Number Mansing
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..