वसुंधरा दिन आणि वृत्तपत्रे

special story on Vasundhara Day and Newspapers
special story on Vasundhara Day and Newspapers
Updated on

वसुंधरा दिनाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्याची सुरवात फारच रंजक आहे. मलेरियाला मारण्यासाठी ‘डीडीटी’चा शोध १९४० च्या सुमारास लागला. या शोधासाठी पॉल हेरमन म्युलर यांना १९४८ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. १९६० च्या सुमारास अमेरिकेत पिकावरील कीटकांना मारण्यासाठी ‘डीडीटी’चा अतिवापर सुरू झाला. या हानिकारक रसायनाचा दुष्परिणाम मानवासह पशुपक्षी, निसर्गावर होत असल्याचे अमेरिकेतील सागरी जीवशास्त्रज्ञ रचेल कार्सन यांच्या लक्षात आले. 

माणसाने निसर्गच्रकात सुरू केलेले अनिर्बंध हस्तक्षेप आणि त्यातून घडणारे अनैसर्गिक बदल यांचे धोके त्यांनी ओळखले. रसायनांच्या अमर्याद वापराने होणाऱ्या दुष्परिणामांबाबत पुरावे गोळा करीत त्यांनी अमेरिकेतील ‘न्यू यॉर्कर’ या साप्ताहिकातून लेखमाला सुरू केली. त्यांचे लेख जसजसे प्रकाशित होऊ लागले, तसतशी लोकजागृती होऊ लागली. कार्सन यांनी जंतनाशक व कीटकनाशक कंपन्यांच्या हितसंबंधाकडे लोकांचे लक्ष वेधले. त्यावरून अमेरिकन नागरिक त्यांच्या लोकप्रतिनिधींना प्रश्‍न विचारू लागले. सरकारवर दबाव वाढू लागला. ‘न्यू यॉर्कर’ साप्ताहिकाचा जाहिरातींचा स्रोत थांबला. त्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. दबाव वाढला. मात्र, तरीही साप्ताहिकाने लेख प्रकाशित करणे सुरूच ठेवले. कार्सन यांनाही धमक्‍या दिल्या गेल्या. मात्र, ते थांबले नाहीत. लोकांचे प्रबोधन करीतच राहिले. पुढे १९६२ च्या सुमारास त्यांचे ‘द सायलंट स्प्रिंग’ नावाचे पुस्तक प्रकाशित झाले. पहिल्याच वर्षी या पुस्तकाच्या पाच लाख प्रती विकल्या गेल्या. त्याचा परिणाम असा झाला, की सिनेटर गेलार्ड नेल्सन यांनी वसुंधरा दिनाची संकल्पना मांडली आणि २२ एप्रिल १९७० ला सुमारे दोन कोटी लोक रस्त्यावर आले. स्वच्छ हवा, पाणी, कायदे यांची त्यांनी मागणी केली. सिनेटर नेल्सन यांनी राष्ट्रीय पर्यावरण शिक्षण ही संकल्पना मांडली आणि ती सुरू करण्यास सरकारला भाग पाडले. पुढे १९७२ मध्ये अमेरिकेत कीटकनाशक नियंत्रणाचा कायदा झाला. दरवर्षी २२ एप्रिल हा वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. कार्सन यांच्या ‘द सायलंट स्प्रिंग’ या पुस्तकाच्या जगभरातील अनेक भाषांत अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. मराठीतही अंजली जोशी यांनी ‘सायलंट स्प्रिंग आणि त्यानंतर...’ हे पुस्तक लिहिले. ते ‘सकाळ’ने प्रकाशित केले आहे. लक्ष्मण लोंढे यांनी रचेल कार्सन यांच्यावर ‘... आणि वसंत पुन्हा बहरला’ हे चरित्रात्मक पुस्तक लिहिले. रचेल यांचे पुस्तक पर्यावरण आंदोलकांना ताकद देते. पर्यावरणवादी आंदोलनाची सुरवात ‘न्यू यॉर्कर’ साप्ताहिकाच्या लेखांमुळे झाली.

लोकहितासाठी मोठे नुकसानही त्यांनी सोसले. या साप्ताहिकाने नुकतीच ९५ वर्षे पूर्ण केली आहेत. वसुंधरा दिनाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असून, या सुवर्णमहोत्सवात संपूर्ण जग कोरोनाने ग्रासलेले आहे. अशा परिस्थितीत वृत्तपत्रे लोकांच्या मुक्ततेसाठी हातभार लावत आहेत. महाराष्ट्रापुरता विचार करता जाहिरात हा वृत्तपत्रांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. आज जाहिराती पूर्णपणे बंद असूनही महाराष्ट्रातील वृत्तपत्रे सुरू आहेत. लोकांना कोरोनाबाबत जागृत करण्याचे व त्यापासून वाचण्यासाठी अनेक उपायही सुचवत आहेत. या वैश्‍विक समस्येपासून मानवाची लवकर सुटका व्हावी, यासाठी धडपडत आहेत. वसुंधरा दिन साजरा करणे हेच तर नव्हे.

हे पण वाचा - ...तर जगभरातील कोरोना संकट होईल दूर                                                  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com