
शिवाजी यादव
कोल्हापूर : मुंबई - पुणे द्रुर्तगती मार्ग व घाट रस्त्यावर महामंडळाच्या एसटीचालकांनी वेग मर्यादा ओलांडल्याबद्दल परिवहन विभागाकडून गेल्या दोन वर्षांत अंदाजे पाच कोटींवर दंड वसूल केला आहे. एसटी महामंडळाने एसटीचालकांच्या वेतनातून दंडाची रक्कम कपात केली आहे. सार्वजनिक हिताची प्रवासी सेवा देणाऱ्या एसटीचालकांकडून तांत्रिक परस्थितीजन्य अडचणीमुळे थोडा वेग वाढू शकतो. ही बाब नैसर्गिक अपवाद मानून दंडात शिथिलता द्यावी, अशी एसटीचालकांची अपेक्षा आहे.