कोल्हापूर - जयसिंगपुरात दहावीचा पेपर फुटल्याने खळबळ I SSC Exam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

केवळ पाचशे रुपयांना पेपर विक्री होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे

कोल्हापूर - जयसिंगपुरात दहावीचा पेपर फुटल्याने खळबळ

जयसिंगपूर : बुधवारी (ता.३०) होणारा दहावीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान-२ विषयाचा पेपर फुटल्याने शहरात खळबळ उडाली आहे. यानंतर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब पोलिस आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत पेपर कस्टडी असणाऱ्या शाळेत गोंधळ घातला. घटनेचे गांभीर्य ओळखून जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी कस्टडी असणारे शाळेत धाव घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांसह सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम हाती घेतले. शहरातील एका शाळेत कस्टडी असून येथून तालुक्यातील शाळांमध्ये पेपर दिले जातात. दहावीच्या पहिल्या पेपरपासूनच पेपर फुटीची चर्चा सुरू होती. मात्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान-२ विषयाचा पेपर मंगळवारीच फुटल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला.

हेही वाचा: 'रुग्णसेवेपेक्षा सुशोभीकरण करून मलिदा कसा खायचा एवढंच ठाकरे सरकारच काम'

दरम्यान, केवळ पाचशे रुपयांना पेपर विक्री होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला असून यात जबाबदार असणाऱ्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या या आंदोलनामुळे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनीही जयसिंगपुरात तळ ठोकला. दरम्यान, या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून पेपरफुटी प्रकरणी जबाबदार असणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांमधून होत आहे. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सुरज भोसले, अमरदीप कांबळे, ॲड संभाजीराजे नाईक यांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान पेपरवरील सिरीज वरून तो नक्की कुठून फुटला याची माहिती जयसिंगपूर पोलिस घेणार आहेत.

हेही वाचा: अनिल देशमुखांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होणार; NCP आमदाराचं मोठं वक्तव्य

Web Title: Ssc 10th Board Exam Paper Leak In Jaysingpur Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..