

board exam guidance videos on YouTube.
sakal
कोल्हापूर : बोर्डाची परीक्षा म्हटल्या की, विद्यार्थी आणि पालकांच्या मनात धास्ती आणि अभ्यासाचा प्रचंड ताण हे समीकरण ठरलेले असते. मात्र, यंदा ही भीती दूर करण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर आणि कोकण विभागीय मंडळाने अभिनव प्रयोग राबवला आहे.