
ST and Aram Bus Accident : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरजवळील ओझरखोल येथे गुरुवारी (ता. १७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एसटी आणि खासगी आराम बसच्या समोरासमोर झालेल्या धडकेत ३४ प्रवासी जखमी झाले. गंभीर जखमींवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले आहे.