Accidental Death : एसटी बसच्या धडकेत राशिवडे बुद्रुकचा वृद्ध ठार; जयसिंगपूर स्थानकात अपघात; चालकावर गुन्हा

Jaisingpur : बसस्थानकात येणाऱ्या सोलापूर-कोल्हापूर बसने पाटील यांना जोराची धडक दिली. एसटीचे डाव्या बाजूचे पुढील चाक पायावरून गेल्याने दोन्ही पाय चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
"Scene of the fatal ST bus accident at Jayasingpur bus station, where an elderly man lost his life. The bus driver is facing charges."
"Scene of the fatal ST bus accident at Jayasingpur bus station, where an elderly man lost his life. The bus driver is facing charges."Sakal
Updated on

जयसिंगपूर : शहरातील बसस्थानकात झालेल्या अपघातात सोलापूर-कोल्हापूर जाणाऱ्‍या एसटीखाली चिरडून पंडित गणपती पाटील (वय ७६, रा. राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) हे जागीच ठार झाले. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातप्रकरणी एसटीचालक सुलेमान अकबर पटेल (सांगोला, जि. सोलापूर) याच्याविरोधात जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद बाळकृष्ण पाटील यांनी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com